India Vs England  x
Sports

Ind Vs Eng सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का, टीम इंडियाच्या कर्णधाराची तब्येत बिघडली

India Vs England : महिला वनडे विश्वचषकापूर्वी भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आला आहे. भारतीय महिला संघ इंग्लंड विरुद्ध ५ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-२० मालिकेतील पहिला सामना आज खेळला जाणार आहे.

Yash Shirke

Ind Vs Eng Test मालिकेतील पहिला सामना भारताने गमावला. लीड्स कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारताचा संघ दुसऱ्या कसोटी सामन्याची तयारी करत आहे. एजबॅस्टन कसोटी जिंकून भारताला आघाडी घेणे आवश्यक आहे. यादरम्यान भारतीय महिला संघ पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचला आहे. टी-२० मालिकेती पहिला सामना आज (२८ जून) सुरु होणार आहे. सामना सुरु होण्यापूर्वी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आजारी पडली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडचा विरुद्ध पहिला टी-२० सामना आज नॉटिंगहॅममध्ये खेळणार आहे. सामन्यापूर्वी काल पत्रकार परिषद पार पडली. पत्रकार परिषदेला हरमतप्रीत कौर अनुपस्थित होती. तिच्या जागी उपकर्णधार स्मृती मानधनाने पत्रकार परिषदेला उपस्थिती लावली. स्मृतीने हरमनप्रीत कौर आजारी असल्याची माहिती दिली.

'हरमनप्रीत कौर आजारी आहे, म्हणून ती पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकली नाही. म्हणून तिच्या जागी मी येथे आली आहे. सामन्यापूर्वी ती बरी होईल अशी आम्ही सर्वजण आशा व्यक्त करत आहोत', असे वक्तव्य भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने म्हटले. आजारपणामुळे हरमनप्रीत कौरचे पहिल्या सामन्यात सहभागी होणे कठीण वाटत आहे.

हरमनप्रीत कौरने २०२५ मध्ये एकही टी-२० सामना खेळलेला नाही. भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिकेत ती या वर्षातला पहिला टी-२० सामना खेळणार आहे. मागच्या वर्षी तिने १५ टी-२० सामन्यांमध्ये ४३.७७ च्या सरासरीने ३९४ धावा केल्या होत्या. ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीमध्ये महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन भारतात होणार आहे. त्यापूर्वी भारताचा महिला संघ इंग्लंडविरुद्ध पाच टी-२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ayurvedic Kadha Recipe : हिवाळ्यात सर्दी - खोकल्यापासून राहाल दूर, रोज प्या 'हा' आयुर्वेदिक काढा

Gratuity Calculation: पगार ₹५०,०००... तर १, २, ३ आणि ४ वर्षानंतर किती ग्रॅच्युटी मिळणार? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

Blood Pressure Impact: नॉर्मल ब्लड प्रेशर असूनही येऊ शकतो हार्ट अटॅक? धडकी भरवणारा संशोधनाचा दावा समोर!

Maharashtra Live News Update : लोणावळा रेल्वे मार्गावर १० दिवस ब्लॉक

Maharashtra politics : चाव्या कुणाकडेही असू दे, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

SCROLL FOR NEXT