Ind Vs Eng : टीम इंडियाने इंग्लंडला धूळ चारली, लॉर्ड्सच्या मैदानावर भारताने इतिहास रचला

India Vs England : भारत विरुद्ध इंग्लंड मिश्र दिव्यांग संघांची सात सामन्यांची टी-२० मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानात खेळला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करत इतिहास रचला.
lords
lordsx
Published On

लीड्समध्ये भारताने पहिला कसोटी सामना गमावला. इंग्लंडने सामना जिंकत मालिकेमध्ये आघाडी मिळावली. एका बाजूला भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीची चर्चा असताना दुसऱ्या बाजूला इंग्लंडमध्ये भारताचा मिश्र दिव्यांग संघ इंग्लंडसोबत टी-२० मालिका खेळत आहे. या संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर ऐतिहासिक विजय नोंदवला आहे.

भारताचा मिश्र दिव्यांग संघ इंग्लंडविरुद्ध सात सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा दोन विकेटने पराभव केला. या सामन्यादरम्यान भारतीय संघातील खेळाडू विक्रांत रवींद्र केनीने उकृष्ट कॅच घेतला. या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

lords
Cricket : ११ महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप; स्टार क्रिकेटपटू अडचणीत, प्रकरणावर बोर्डाची प्रतिक्रिया समोर

तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना नऊ विकेट गमावून १२३ धावा केल्या. ए. ब्राउनने ४७ चेंडूत सर्वाधिक ७७ धावा केल्या. भारताकडून वेगवान गोलंदाज विवेक कुमारने ३ षटकात १६ धावा देत तीन विकेट घेतल्या. डावखुरा फिरकी गोलंदाज आणि कर्णधार रवींद्र सांतेने चार षटकात फक्त ८ धावा देऊन तीन खेळाडूंना माघारी पाठवले. यानंतर, इंग्लंडकडून उत्कृष्ट गोलंदाजी होत असूनही भारताने शेवटच्या षटकात ८ विकेट गमावून विजयाचे लक्ष्य गाठले. साई आकाशने सर्वाधिक ४४ धावा केल्या. मालिकेत अजून चार सामने शिल्लक असून भारत सध्या २-१ ने पिछाडीवर आहे.

lords
Priyanka Chopra : Virgin पत्नी शोधू नका, प्रियंका चोप्राने व्हायरल पोस्टवर दिलं स्पष्टीकरण; म्हणाली, हे माझं मत...

भारताच्या विजयानंतर भारतीय अपंग क्रिकेट परिषदेचे सरचिटणीस रवी चौहान यांनी 'आम्ही हा ऐतिहासिक विजय कपिल देव यांच्या १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाला समर्पित करतो' असे वक्तव्य केले. या सामन्यादरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधत माजी गोलंदाज दिलीप जोशी यांना श्रद्धांजली वाहिली.

lords
Pune Crime : तुझ्यामुळे माझं ब्रेकअप झालं, ऑफिसमधल्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडकरुन तरुणाला बेदम मारहाण, बंदूक रोखली अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com