Priyanka Chopra : Virgin पत्नी शोधू नका, प्रियंका चोप्राने व्हायरल पोस्टवर दिलं स्पष्टीकरण; म्हणाली, हे माझं मत...

Priyanka Chopra Instagram : प्रियंका चोप्राने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे. या पोस्टमध्ये तिने व्हर्जिनिटीशी संबंधित एका पोस्टवर स्पष्टीकरण दिले आहे.
Priyanka Chopra
Priyanka ChopraSaam Tv
Published On

Priyanka Chopra News : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा हॉलिवूडमध्ये रमली आहे. लग्नानंतर तिने भारत सोडून अमेरिकेत राहण्याचा निर्णय घेतला. अभिनयासोबतच प्रियंका चोप्रा तिने केलेल्या वक्तव्यांबाबतची चर्चेत असते. प्रियंका सोशल मीडियावर देखील सक्रीय आहे. तिने शेअर केलेल्या एका पोस्टची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे.

Priyanka Chopra
Marathi Actress : नवऱ्याचं अफेअर कळलं, नंतर अभिनेत्रीनं मोठं पाऊल उचललं, आता दुसऱ्या व्यक्तीसोबत ८ वर्षांपासून राहतेय लिव्ह इनमध्ये

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात प्रियंकाने व्हर्जिनिटीवर वक्तव्य केल्याचे म्हटले आहे. 'व्हर्जिन पत्नी शोधू नका. चांगला शिष्टाचार असलेल्या मुलीशी लग्न करा. व्हर्जिनिटी तर एका रात्रीत नष्ट होते, पण शिष्टाचार कायम राहतो', असे प्रियंका चोप्राने म्हटल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. हीच पोस्ट शेअर करत प्रियंका चोप्राने स्पष्टीकरण दिले आहे.

priyanka chopra
priyanka choprax

व्हायरल पोस्ट शेअर करताना प्रियंका चोप्रा म्हणाली, 'मी हे कधीच म्हटलेले नाही, हे माझे मत नाही. जर एखादी गोष्ट ऑनलाइन असेल, सोशल मीडियावर असेल याचा अर्थ ती खरी आहे असा होत नाही. आजकाल फेक गोष्टी तयार करणे सोपे झाले आहे. तेव्हा कन्टेंटची नेहमीच उलटतपासणी करा. जे काही स्क्रोल करत आहात त्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका.'

Priyanka Chopra
Cricket : ११ महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप; स्टार क्रिकेटपटू अडचणीत, प्रकरणावर बोर्डाची प्रतिक्रिया समोर

आगामी चित्रपट

प्रियंका चोप्रा लवकरच 'हेड्स ऑफ स्टेट' या अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. सध्या प्रियंका याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यानंतर ती एसएस राजामौली यांच्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका निभावणार आहे. एसएस राजामौली यांच्या आगामी चित्रपटात प्रियंका चोप्रा आणि महेश बाबू अशी जोडी पाहायला मिळणार आहे.

Priyanka Chopra
Pune : माझी लेक हरवलीये, पालकांची तक्रार; पण नंतर वैष्णवी ४५ फूट खोलवर सापडली, वडिलांचा मन हेलावणारा टाहो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com