
पुणे : पिंपरी चिंचवडमधील दिघी परिसरातून बेपत्ता झालेल्या वैष्णवी इंगवले या १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह गुरुवारी सकाळी चरहोलीच्या चोविसवाडी येथील एका खोल विहिरीमध्ये आढळला. २५ जून रोजी वैष्णवी बेपत्ता झाली होती. घरी न परतल्याने वैष्णवीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी वैष्णवीसाठी शोधमोहिम सुरु केली.
शोधमोहिमेदरम्यान वैष्णवीच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीजवळ वैष्णवीचा कपड्याचा तुकडा सापडला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाने बचाव कार्य सुरु केले. चोविसवाडी, मोशी आणि पिंपरी येथून अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या. आपत्कालीन पथकाला वैष्णवीचा मृतदेह विहिरीच्या पृष्ठभागापासून तब्बल ४५ फूट खाली सापडला.
मोहिमेदरम्यान विहिरीतील पाण्यात अंडरवॉटर कॅमेरे टाकण्यात आले होते. मृतदेह आढळल्यानंतर दोरीच्या उपकरणांच्या मदतीने वैष्णवीचा मृतदेड विहिरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलिसांनी शवविच्छेदन तपासणीसाठी मृतदेह पाठवला आहे.
'वैष्णवीच्या मृत्यूचे कारण दर्शवणारी माहिती अजूनही आम्हाला मिळालेली नाही. प्राथमिक निरीक्षणातून हा अपघाती मृत्यू असू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. पण आत्महत्या किंवा घातपात यांसारख्या गोष्टींची शक्यता नाकारता येणार नाही', असे दिघी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बापू ढेरे यांनी म्हटले आहे. वैष्णवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्याच्या अहवालामध्ये वैष्णवीच्या मृत्यूचे कारण समोर येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.