Raja Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, आरोपींनी कोर्टात घेतला यू-टर्न

Raja Raghuvanshi Case : राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आला आहे. हत्याकांडात अटक झालेल्या दोन आरोपींनी न्यायालयात यू-टर्न घेत गुन्ह्याची कबुली देण्यास नकार दिला आहे.
Raja Raghuvanshi Case
Raja Raghuvanshi Casex
Published On

राजा रघुवंशी हत्या प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आला आहे. या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आकाश आणि आनंद या दोन आरोपींनी न्यायालयात कबुलीजबाब नाकारला आहे. दोघांनी गुन्हा कबुल करण्यास नकार दिला आहे. 'त्यांनी न्यायालयात कबुलीजबाब देण्यास नकार दिला असला, तरी आमच्याकडे त्यांच्याविरुद्ध अनेक पुरावे आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षा मिळणारच', असे पोलिसांनी म्हटले आहे. मेघालय पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोघांनी चौकशीदरम्यान गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्वीकारले होते. पण आता दंडाधिकाऱ्यांसमोर त्यांनी मौन पाळले आहे.

२९ वर्षीय राजा रघुवंशीची त्याच्या पत्नीसह, सोनमसह मेघालयला हनीमून ट्रीपसाठी गेला होता. ११ मे रोजी राजा आणि सोनमचे लग्न झाले होते. २३ मे रोजी शिलाँगपासून ६५ किमी अंतरावर असलेल्या सोहरा येथे दोघे बेपत्ता झाले होते. २ जून रोजी राजाचा मृतदेह धबधब्याच्या जवळील एका खड्यात आढळला. राजाची पत्नी सोनम आणि तिचा कथित प्रियकर राज कुशवाह यांच्यावर राजाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

Raja Raghuvanshi Case
Maharashtra Politics: नाशिकमध्ये शिंदे गटाची मोठी खेळी, ठाकरेंचा बडा नेता गळाला; ८ माजी नगरसेवकांसह 'धनुष्यबाण' घेणार हाती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी या तीन मारेकऱ्यांनी सोनमच्या उपस्थितीमध्ये राजाला चाकूने भोसकून मारले आणि त्याचा मृतदेह खोल दरीत टाकून दिला. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना ताब्यात घेतले आहेत. यात सोनम, राज, तीन मारेकरी आणि पुरावे नष्ट करणाऱ्या तिघांचा समावेश आहे. यातील आकाश आणि आनंद यांनी हत्येमधील सहभाग स्वीकारत पोलिसांना संपूर्ण माहिती दिली होती. पण न्यायालयात दंडाधिकाऱ्यांसमोर त्यांनी गुन्हा कबुल करण्यास नकार दिला.

Raja Raghuvanshi Case
Sharad Pawar: हिंदी सक्तीविरोधातील ठाकरे बंधूंच्या मोर्चात सहभागी होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी यांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दंडाधिकाऱ्यांसमोर ते गप्प राहिले आणि जबाब देण्यास नकार दिला. आम्ही पाच आरोपींपैकी फक्त दोघांनाच दंडाधिकाऱ्यांकडे पाठवले होते. सुरुवातीला त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली होती. पण आता त्यांना जबाब द्यायचा नाहीये, असे मेघायल पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

Raja Raghuvanshi Case
Thackeray: राज - उद्धव ठाकरे मराठीसाठी मैदानात; बंधू एकत्र येत असताना भाजपची मोठी खेळी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com