Maharashtra Politics: नाशिकमध्ये शिंदे गटाची मोठी खेळी, ठाकरेंचा बडा नेता गळाला; ८ माजी नगरसेवकांसह 'धनुष्यबाण' घेणार हाती

Eknath Shinde And Uddhav Thackeray: नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठी धक्का बसला आहे. बड्या नेत्यासह ८ माजीनगरसेवक लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये शिंदे गटाची ताकद आणखी वाढणार आहे.
Maharashtra Politics: नाशिकमध्ये शिंदे गटाची मोठी खेळी, ठाकरेंचा बडा नेता गळाला; ८ माजी नगरसेवकांसह 'धनुष्यबाण' घेणार हाती
Eknath Shinde ANd Uddhav ThackeraySaam Tv
Published On

नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाने मोठी खेळी केली आहे. ठाकरेंच्या शिलेदाराला फोडण्यात शिंदे गटाला यश आले आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह ८ माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. हे सर्वजण लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. येत्या रविवारी ते धनुष्यबाण हाती घेणार आहेत.

ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे हे रविवारी शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत ८ माजी नगरसेवक, शेकडो कार्यकर्ते आणि समर्थक देखील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील २ माजी आमदार देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. विलास शिंदे यांनी गेल्या काही दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला. आता ते शिंदे गटात येणार आहेत.

Maharashtra Politics: नाशिकमध्ये शिंदे गटाची मोठी खेळी, ठाकरेंचा बडा नेता गळाला; ८ माजी नगरसेवकांसह 'धनुष्यबाण' घेणार हाती
Maharashtra Politics: भास्कररावांच्या दिव्याला कुणाचं तेल? आता जाधव- राऊत आमनेसामने?

आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वी हा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. विलास शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक शिंदे गटात येणार असल्यामुळे नाशिकमध्ये शिंदे गटाची ताकद आणखी वाढणार आहे. सुधाकर बडगुजर यांच्यानंतर उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती सुरूच आहे. ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत असून आऊटगोईंग सुरू आहे. ठाकरे गटाचे नेते शिंदे गटामध्ये जात असल्यामुळे शिंदे गटाची ताकद वाढत चालली आहे.

Maharashtra Politics: नाशिकमध्ये शिंदे गटाची मोठी खेळी, ठाकरेंचा बडा नेता गळाला; ८ माजी नगरसेवकांसह 'धनुष्यबाण' घेणार हाती
Politics: उत्तर महाराष्ट्रात अजित पवारांकडून शरद पवारांना धक्का, बड्या नेत्यासह मुलाने हातात घातलं 'घड्याळ'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com