Ind Vs Eng कसोटी मालिकेदरम्यान मिळाली आनंदाची बातमी! भारतीय खेळाडूच्या घरी पाळणा हलला

Mukesh Kumar Baby : भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याच्या घरी लहान पाहुण्याचे आगमन झाले. सोशल मीडियावर पोस्ट करत मुकेशने मुलगा झाल्याची माहिती चाहत्यांना दिली.
social media post
social media postinsta
Published On

भारतीय क्रिकेटपटू मुकेश कुमारच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. मुकेश आणि त्याची पत्नी दिव्या यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत मुकेश कुमारने ही गोड माहिती चाहत्यांना दिली आहे. या फोटोमध्ये मुकेश, पत्नी दिव्या आणि त्यांच्या मुलाचा हात असल्याचे पाहायला मिळते.

social media post
Cricket : ११ महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप; स्टार क्रिकेटपटू अडचणीत, प्रकरणावर बोर्डाची प्रतिक्रिया समोर

भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने आज (शुक्रवार २७ जून) इन्स्टाग्राम अकाउंटवर पत्नी दिव्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले. या पोस्टला मुकेशने एक नवीन अध्याय सुरु करत आहे... असे भावनिक कॅप्शन दिले आहे. या पोस्टमध्ये लहान बाळाने मुकेशचे बोट त्याच्या छोट्या हातांनी पकडल्याचे दिसते.

मुकेश कुमारने शेअर केलेल्या फोटोला फक्त एका तासात हजारो लाईक्स मिळाले आहेत. अनेक दिग्गज खेळाडूंनी पोस्टवर कमेंट करत मुकेशचे अभिनंदन केले आहे. सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, मोहित शर्मा यांसारख्या अनेक क्रिकेटपटूंनी मुकेशला शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनी देखील मुकेश कुमार आणि त्याची पत्नी दिव्या या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

social media post
Viral : अजबच! २१ वर्षीय तरुणाने स्वत:च्या ६५ वर्षीय आजीशी केलं लग्न, आजोबाच्या निधनानंतर दोघांमधील जवळीक वाढली

भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यापूर्वी इंडिया ए आणि इंग्लंड लायन्स यांच्यातही सराव सामने खेळले गेले होते. मुकेश कुमारला इंग्लंडविरुद्ध भारताच्या अ संघात स्थान मिळाले होते. आता वरिष्ठ संघाचे अधिकृत कसोटी सामने सुरू आहेत. अनधिकृत कसोटी सामन्यानंतर मुकेश कुमार भारतात परतला. या मालिकेदरम्यान त्याचा मुलगा जन्माला आला.

social media post
बिग बॉस फेम घनश्याम दरोडेची हार्ट अॅटॅकनं मृत्यू झाल्याची अफवा; छोटा पुढारी व्हिडिओद्वारेच थेट लोकांसमोर आला!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com