बिग बॉस फेम घनश्याम दरोडेची हार्ट अॅटॅकनं मृत्यू झाल्याची अफवा; छोटा पुढारी व्हिडिओद्वारेच थेट लोकांसमोर आला!

Big Boss Marathi फेम धनश्याम दरोडेचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. या अफवांवर छोट्या पुढारीने व्हिडीओ पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे.
chota pudhari
chota pudhari x
Published On

Big Boss मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये छोटा पुढारी ऊर्फ घनश्याम दरोडेने सहभाग घेतला होता. घनश्याम दरोडेचे निधन झाले अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्याचा हार घातलेला फोटो सुद्धा सोशल मीडियावर पाहायला मिळाला होता. पण या सर्व पोस्ट, व्हिडीओ, फोटो अफवा असल्याचे छोटा पुढारीने स्पष्ट केले आहे.

chota pudhari
Ind Vs Eng : टीम इंडियाने इंग्लंडला धूळ चारली, लॉर्ड्सच्या मैदानावर भारताने इतिहास रचला

घनश्याम दरोडेने इन्स्टाग्रामवर नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 'नमस्कार मित्रांनो, सर्वाचे आभार. आजपर्यंत मी कमेंट्स पाहत आलोय. कुणी मला ट्रोल केले. चिडवले, डिवचले. कोणीतरी वाईट बोलायचे, कुणी चांगलं बोलायचे. माणूस गेल्यानंतर त्याच्यामागे माणसं किती चांगलं बोलतात हे मला आज कळलं आहे. भलेही ती व्यक्ती जिवंत असो वा नसो', असे घनश्यामने म्हटले आहे.

'कोणीतरी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. बिग बॉस फेम घनश्याम दरोडेचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सगळ्यांना एक विनंती करतो. तुमच्या घनश्यामला काहीच झालं नाहीये. महत्त्वाचं म्हणजे जर कुणी एखाद्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहिली, तर त्याचे आयुष्य वाढत जाते. ज्यांनी माझ्या निधनाची खोटी माहिती पुरवली, त्या दादांना एकच विनंती आहे, हे इतर कुणाच्याही सोबत करु नका. काळजी करु नका, फोन करु नका, टेन्शन घेऊ नका, मला काहीही झालेले नाही', असे व्हिडीओत छोट्या पुढारी म्हणाला.

chota pudhari
Nanded : दोनशे रुपयांसाठी वाद, मॅनेजरने कामावरुन काढल्याचा राग; अपमान सहन न झाल्यानं तरुणानं स्व:तला संपवलं

स्वत:च्या फोटोला हार घातलेला फोटो आणि पोस्टर घनश्यामने व्हिडीओच्या शेवटी शेअर केले. या पोस्टरवर ‘पुढाऱ्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्याला पुढाऱ्यांनी शोधून काढत वाहिली आदरांजली’ असे लिहिलेले दिसते. घनश्यामचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यादरम्यान घन:श्याम दरोडेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

chota pudhari
Ulhasnagar Crime : उल्हासनगरात महिलेचा विनयभंग प्रकरणी डॉक्टरला अटक, दोन तासात पोलिसांनी केली मोठी कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com