Nanded : दोनशे रुपयांसाठी वाद, मॅनेजरने कामावरुन काढल्याचा राग; अपमान सहन न झाल्यानं तरुणानं स्व:तला संपवलं

Nanded News : एका तरुणाला दोनशे रुपयांसाठी त्याच्या मॅनेजरने कामावरुन काढून टाकले. सर्वांसमोर झालेला अपमान सहन न झाल्याने १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. या प्रकरणी तरुणाच्या पालकांच्या तक्रारीनंतर मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nanded News
Nanded NewsSaam Tv
Published On

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही, प्रतिनिधी

ग्राहकाकडून दोनशे रुपये मोबाईलवर मागवून का घेतले म्हणून मॅनेजरने अपमान करून कामावरून काढले. हाच अपमान सहन न झल्याने एका 19 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नांदेड शहरातील सांगवी प्रभागातील गोपाळनगर येथे ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रविराज पुंडलिक इंगळे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात कंपनीचा मॅनेजवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविराज इंगळे हा छत्रपती चौक येथील इजी डील फायनान्स कंपनीमध्ये कम्प्युटर ऑपरेटर पदी काम करत होता.

Nanded News
Pune Crime : तुझ्यामुळे माझं ब्रेकअप झालं, ऑफिसमधल्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडकरुन तरुणाला बेदम मारहाण, बंदूक रोखली अन्...

२४ जून रोजी रविराज नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. याच दरम्यान त्याने आपल्या मोबाईलवर एका ग्राहकाचे दोनशे रुपये ऑनलाईन मागवून घेतले होते. ही बाब फायनान्स कंपनीचा मॅनेजर मंगेश मग्गीवार याला समजली. त्यानंतर मॅनेजरने ग्राहकाचे २०० रुपये का घेतले म्हणून त्याला सर्वासमोर रागावले. तसेच मोबाईल काढून घेऊन कामावरून काढून टाकले.

Nanded News
Ulhasnagar Crime : उल्हासनगरात महिलेचा विनयभंग प्रकरणी डॉक्टरला अटक, दोन तासात पोलिसांनी केली मोठी कारवाई

सर्वांसमोर झालेला अपमान सहन न झाल्याने रविराजने गळफास घेऊन आत्महत्या केली.रविराजच्या मृत्यूस मॅनेजर जवाबदार असल्याचा आरोप रविराजच्या आई-वडिलांनी केला आहे.आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. रविराज हा एकुलता एक मुलगा होता. मुलाने उचललेल्या टोकाच्या पाऊलामुळे कुटुंबियांवर दुःखाच डोंगर कोसळलं आहे.

Nanded News
Ind Vs Eng : टीम इंडियाने इंग्लंडला धूळ चारली, लॉर्ड्सच्या मैदानावर भारताने इतिहास रचला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com