Viral : अजबच! २१ वर्षीय तरुणाने स्वत:च्या ६५ वर्षीय आजीशी केलं लग्न, आजोबाच्या निधनानंतर दोघांमधील जवळीक वाढली

Haryana News : हरियाणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. २१ वर्षीय मोहम्मद इरफान या तरुणाने त्याच्या ६५ वर्षीय आजीशी, सुलताना खातूनशी लग्न केले. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Viral
Viralx
Published On

Viral News : २१ वर्षीय तरुणाने आपल्या ६६ वर्षीय आजीशी लग्न केल्याची घटना हरियाणामध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठा वाद निर्माण झाला आहे. समाजाच्या नियमांना न जुमानता या तरुणाने स्वत:च्या आजीशी लग्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दोघांनी लोकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत आपल्या नात्याला औपचारिक रूप दिले आहे.

Viral
बिग बॉस फेम घनश्याम दरोडेची हार्ट अॅटॅकनं मृत्यू झाल्याची अफवा; छोटा पुढारी व्हिडिओद्वारेच थेट लोकांसमोर आला!

मिळालेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय मोहम्मद इरफानने त्याची आजी सुलताना खातून निकाह केला. सुलताना यांच्या पतीच्या निधनानंतर इरफान त्याच्या आजीची, सुलताना यांची काळजी घेत असे. यातून दोघांमधील नाते अधिक घट्ट झाले. आजीच्या कठीण काळात मोहम्मदने तिची काळजी घेतली होती. त्यानंतर या नात्याला रोमँटिक वळण आले.

Viral
Nanded : दोनशे रुपयांसाठी वाद, मॅनेजरने कामावरुन काढल्याचा राग; अपमान सहन न झाल्यानं तरुणानं स्व:तला संपवलं

हळूहळू मोहम्मद इरफान आणि सुलताना खातून यांच्या नात्यात जवळीक वाढली आणि दोघांमध्ये भावनिक नाते निर्माण झाले. हे नाते पुढे जाऊन विवाहात रूपांतरित झाले. गावकऱ्यांनी आणि नातेवाइकांनी या नात्याला तीव्र विरोध दर्शवला असून मोठा संताप व्यक्त केला आहे. तरीही इरफान आणि सुलताना आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

Viral
Ind Vs Eng : टीम इंडियाने इंग्लंडला धूळ चारली, लॉर्ड्सच्या मैदानावर भारताने इतिहास रचला

आजकाल लग्नाशी संबंधित अनेक चित्रविचित्र गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत. नवरी सासऱ्यासोबत पळून गेली, सासू जावयाच्या प्रेमात पडली, दीराचे वहिनीशी सूत जुळले. अशा चित्रविचित्र गोष्टींमध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. ६६ वर्षीय आजी आणि २१ वर्षीय तरुण यांचे लग्नाचे प्रकरण सध्या सोशल मीडियावरही चांगलेच चर्चेत आहे.

Viral
Ulhasnagar Crime : उल्हासनगरात महिलेचा विनयभंग प्रकरणी डॉक्टरला अटक, दोन तासात पोलिसांनी केली मोठी कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com