Mohammed Siraj Ind vs Eng 5th Test X
Sports

Ind vs Eng : कॅच सुटला की, मॅच? मोहम्मद सिराजची मोठी चूक अन् इंग्लंडला मिळालं जीवनदान, शुभमन गिल भडकला; Video

Ind vs Eng 5th Test : भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील पाचवा कसोटी सामना ओव्हल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यामध्ये मोहम्मद सिराजच्या चुकीमुळे इंग्लंडच्या संघाला जीवनदान मिळाले आहे.

Yash Shirke

  • ओव्हल कसोटी निर्णायक वळणावर आहे.

  • या कसोटीत मोहम्मद सिराजने हॅरी ब्रूकचा झेल सोडला.

  • जीवनदान मिळाल्यानंतर ब्रूकने एका ओव्हरमध्ये १६ धावा केल्या.

India vs England 5th Test : भारत विरुद्ध इंग्लंड ओव्हल कसोटी निर्णायक टप्प्यावर आहे. कसोटी सामन्याचा चौथा दिवस सुरु आहे. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दुसऱ्या डावात इंग्लंडची फलंदाजी असताना मोहम्मद सिराजकडून मोठी चूक झाली. ही चूक भारताला महागात पडू शकते असे म्हटले जात आहे. मैदानात नेमकं काय घडलं?

ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवशी २२ व्या ओव्हरमध्ये प्रसिद्ध कृष्णाने बेन डकेटला बाद केले. त्यानंत ऑली पोप हा मोहम्मद सिराजच्या चेंडूवर एलबीडब्लू आउट झाला. त्यानंतर जो रूट आणि हॅरी ब्रूक हे दोघे फलंदाजी करत होते. ३४ व्या ओव्हरमध्ये प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजी करण्यासाठी आला. तेव्हा हॅरी ब्रूककडे स्ट्राईक होती. त्याने पुढे येऊन जोरदार शॉट मारला.

हॅरी ब्रूकने शॉट मारल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या दिशेने गेला. तेथे मोहम्मद सिराज उभा होता. त्याने चेंडू झेलला, पण झेल घेतल्यानंतर त्याचा एक पाय सीमारेषेला लागला. त्यानंतर तो सीमारेषेच्या बाहेर सुद्धा गेला. परिणामी हॅरी ब्रूकला जीवनदान मिळाले. विकेट मिळाल्याच्या आनंदात असलेला प्रसिद्ध कृष्णाचा चेहरा पडला. कर्णधार शुभमन गिल सुद्धा सिराजवर रागावला.

ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर जीवनदानासह षटकार मिळाल्यानंतर हॅरी ब्रूक पेटून उठला. तिसऱ्या चेंडूवर एक चौकार आणि पाचव्या चेंडूवर दुसरा चौकार मारत प्रसिद्ध कृष्णाच्या ओव्हरमध्ये एकट्या हॅरी ब्रूकने १६ धावा केल्या. हॅरी ब्रूकला मिळालेले जीवनदान भारतासाठी धोकादायक ठरु शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या सत्राच्या शेवटी ३० चेंडूंवर नाबाद ३८ धावा हॅरी ब्रूकने केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today : दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात वाढ! ग्राहकांच्या खिशाला फटका, वाचा २४ अन् २२ कॅरेट सोन्याची किंमत

The Bads Of Bollywood Review: किंग खानच्या मुलाची 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' वेब सिरीज पास की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यूव

Teachers Recruitment: सुवर्णसंधी! राज्यात ६२०० प्राध्यापक आणि २९०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी भरती, अर्ज करण्याची मुदत काय?

Pitru Paksha Rituals: पितृपक्षात वाढदिवस साजरा करावा का? शास्त्र काय सांगते

Brain Eating amoeba : सावधान! देशात मेंदू खाणाऱ्या अमिबाचा पुन्हा उद्रेक, केरळमध्ये १९ जणांचा मृत्यू | VIDEO

SCROLL FOR NEXT