India vs England 5th Test x
Sports

Ind vs Eng : शेवटच्या विकेटआधी वाद! मोहम्मद सिराज कॅप्टन गिलवर संतापला, नेमकं काय घडलं? Video

India vs England 5th Test : भारताने ओव्हल कसोटी जिंकली. शेवटची गस एटकिन्सनची विकेटआधी पडण्याआधी मैदानात वाद झाला. मोहम्मद सिराज ध्रुव जुरेल आणि शुभमन गिलवर चिडला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली.

Yash Shirke

  • भारत विरुद्ध इंग्लंड ओव्हल कसोटीतील वाद

  • रनआउट चुकल्याने सिराज कॅप्टन गिलवर चिडला

  • मैदानातील राड्याचा व्हिडीओ व्हायरल

Ind vs Eng 5th Test : ओव्हल कसोटी जिंकत भारताने कसोटी मालिकेमध्ये बरोबरी केली. या मालिकेमध्ये दोन सामने जिंकत इंग्लंडने आघाडी घेतली होती. शेवटचा ओव्हल कसोटी सामना जिंकत भारताला मालिका ड्रॉ करण्यात यश मिळाले. ओव्हल कसोटी ही पूर्णपणे रोमांचक ठरली. अटीतटीच्या सामन्यात भारताच्या युवा संघाने बाजी मारली.

भारत विरुद्ध इंग्लंड पाचवी कसोटी भारताने जिंकली. गस एटकिन्सनच्या विकेटआधी मोहम्मद सिराज हा शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल यांच्यावर चिडला होता. सिराजने त्याच्या कर्णधाराकडे, शुभमन गिलकडे रागात पाहिले होते. भारताला सामना जिंकण्यासाठी फक्त एक विकेट हवी असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

ओव्हल कसोटीच्या पाचव्या दिवशी ८२ व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी मोहम्मद सिराज आला. तेव्हा भारताला एका विकेटची गरज होती आणि इंग्लंडला ११ धावा हव्या होत्या. तेव्हा गस एटकिन्सनकडे स्ट्राईक होती. शेवटच्या चेंडूवर एटकिन्सनने धाव घेण्यासाठी शॉट मारला. तेव्हा स्टंपमागे असलेल्या ध्रुव जुरेलला नॉन स्ट्रायकर बाजूला असलेल्या ख्रिस वोक्सला बाद करण्याची संधी होती. पण ही संधी हुकली. एटकिन्सन आणि वोक्स यांनी धाव पूर्ण केली. यावरुन सिराज ध्रुववर रागावला. रागाच्या भरात तो शुभमन गिलला 'तू त्याला (ध्रुवला) सांगितलं नाहीस' असे म्हणाला.

सामना संपल्यावर पत्रकार परिषदेमध्ये मोहम्मद सिराज आणि शुभमन गिल यांनी भाष्य केले. 'सिराजने मला सांगितले होते, मी ध्रुवला सांगितले तेव्हा तो धावू लागला. ध्रुवला वेळ मिळाला नाही म्हणून तो रनआउट हुकला. त्याचे ग्लोव्हज काढायला का सांगितलं नाहीस असे सिराज मला म्हणाला होता', अशी माहिती शुभमन गिलने दिली. यानंतर शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज पत्रकार परिषदेत हसू लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Weather Update: IMDच्या नव्या अंदाजानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली; महाराष्ट्रात दोन आठवडे पावसाची दांडी

Plane Crash: अमेरिकेत आणखी एक दुर्घटना; समुद्रात कोसळले विमान

Mumbai Crime: मुंबई हादरली! तरुणाकडून अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार, गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म

Tuesday Horoscope : वाईट संकटांचा सामना करावा लागेल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Milk Mithai: दूधापासून घरीच बनवा 'या' टेस्टी मिठाई

SCROLL FOR NEXT