Shubman Gill Century x
Sports

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Ind Vs Eng 4th Test : भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिलने मँचेस्टर कसोटीच्या शेवटच्या दिवशी शतक ठोकले आहे. या कसोटी मालिकेत शुभमन गिलने तब्बल चौथ्यांदा शतकीय खेळी केली आहे.

Yash Shirke

  • भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना सुरु आहे.

  • या सामन्याच्या शेवटच्या दिवशी शुभमन गिलने त्याचे शतक पूर्ण केले.

  • शुभमन गिलने या शतकीय खेळीसह अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

India vs England : भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताचा कर्णधार शुभमन गिलने शतकीय खेळी केली आहे. त्याने २२९ चेंडूंमध्ये १२ चौकार मारत शतक पूर्ण केले आहे. या कसोटी मालिकेतील शुभमन गिलचे हे चौथे शतक आहे. शुभमन गिलच्या शतकासह भारताचा डाव २०० पार गेला आहे. गिलच्या खेळीमुळे भारताचा डाव सावरल्याचे म्हटले जात आहे.

अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीमधील चौथ्या कसोटीत भारताने प्रथम फलंदाजी करत ३५८ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडच्या संघाने भव्यदिव्य असा ६६९ धावांचा डोंगर उभारला. दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच भारताने यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन असे दोन धक्के मिळाले. तेव्हा १ धाव आणि २ विकेट्स अशी भारताची परिस्थिती होती.

शुभमन गिलने केएल राहुलच्या साथीने भारताचा डाव सावरला. दोघे चौथ्या दिवसाच्या शेवटपर्यंत टिकून राहिले. पण पाचव्या आणि शेवटच्या दिवसाच्या सुरुवातीला केएल राहुलची विकेट पडली. वॉशिंग्टन सुंदर सोबत शुभमन गिलने डाव पुढे नेला. सावधगिरी सांभाळत शुभमन गिलने त्याचे शतक पूर्ण केले.

शुभमन गिलने भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेच्या पहिल्या कसोटीत शतक, दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात शतक, दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात द्विशतक आणि चौथ्या शतकात शतक अशी दमदार कामगिरी केली आहे. वयाच्या २५ व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल १८ शतके ठोकली आहे. शुभमन गिलने कसोटीत ९, वनडेमध्ये ८ आणि टी-२० मध्ये १ शतक केले आहे. मागील ३५ वर्षात मँचेस्टरमध्ये शतक ठोकणारा शुभमन गिल हा पहिला भारतीय खेळाडू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT