
भारत विरुद्ध इंग्लंड मँचेस्टर कसोटीदरम्यान इंग्लंडचा रडीचा डाव
सामन्यादरम्यान इंग्लंडच्या खेळाडूने केला बॉल टॅम्परिंगचा प्रयत्न?
रिकी पॉन्टिंग यांनी स्काय स्पोर्ट्सवर दिली धक्कादायक माहिती
India Vs England : मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे सध्या भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये इंग्लंडचे पारडे जड असल्याचे पाहायला मिळत आहे. चौथ्या कसोटीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामन्यामध्ये इंग्लंडने बॉल टॅम्परिंग केल्याचा दावा नेटकरी करत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये इंग्लंडचा खेळाडू बॉल टॅम्परिंग करत असल्याचे म्हटले जात आहे. व्हिडीओमुळे इंग्लंडने सामन्यात रडीचा डाव खेळला आहे, असे अनेकजण म्हणत आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये इंग्लंडचा गोलंदाज ब्रायडन कार्स जाणूनबुजून त्याच्या बुटाने चेंडू दाबत असल्याचे पाहायला मिळते. त्यावेळेस माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉन्टिंग यांनी ही गोष्ट लक्षात आणून दिली. 'कार्स त्याच्या बुटाने चेंडू घासत आहे. हा चेंडू एका बाजूने खराब होईल आणि नंतर रिव्हर्स स्विंग होईल', असे रिकी पॉन्टिंग यांनी म्हटले होते.
स्काय स्पोर्ट्स क्रिकेटवर रिकी पॉन्टिंग यांनी कार्सने केलेल्या कृतीवर प्रतिक्रिया दिली. ही घटना ब्रायडन कार्सच्या शेवटच्या ओव्हरमध्ये घडली. तो त्याच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूशी छेडछाड करत होतो. तो बुटाने चेंडू घासतो. चेंडूच्या चमकदार भागावर स्पाइकचे चिन्ह बनवतो, अशी महत्त्वाची माहिती रिकी पॉन्टिंग यांनी दिली.
मँचेस्टर कसोटीमध्ये भारताने सुरुवातीला ३५८ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावामध्ये तब्बल ६६९ धावा केल्या. त्यानंतर चौथ्या दिवशी शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी चांगली भागीदारी केली. पण शेवटच्या दिवसाच्या सुरुवातीला केएल राहुलला बेन स्टोक्सने बाद केले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर फलंदाजी करण्यासाठी आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.