Ind vs Eng : पराभवाच्या छायेत असणाऱ्या टीम इंडियाचा खुशखबर! इंग्लंडचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

Ben Stokes : भारत विरुद्ध इंग्लंड मँचेस्टर कसोटीदरम्यान इंग्लंडच्या संघाचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स दुखापतग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
Ind vs Eng 4th Test
Ind vs Eng 4th Testx
Published On
Summary
  • भारत विरुद्ध इंग्लंड मँचेस्टर कसोटी सुरु आहे.

  • या कसोटीदरम्यान इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स दुखापतग्रस्त झाला आहे.

  • बेन स्टोक्स दुखापतग्रस्त झाल्याने इंग्लंडच्या संघाचे टेन्शन वाढले आहे.

Ind vs Eng 4th Test : मँचेस्ट कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी इंग्लंडच्या संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स दुखापतग्रस्त झाला आहे. पाचव्या दिवशी तो गोलंदाजी करणार नसल्याचे म्हटले जात आहे. सामन्याच्या पहिल्या डावात बेन स्टोक्सने पाच विकेट्स घेतल्या होत्या, आता शेवटच्या दिवशी स्टोक्स गोलंदाजी करणार नसल्याने भारतीय संघाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

जानेवारी २०२५ मध्ये बेन स्टोक्सची हॅमस्ट्रिंगची सर्जरी झाली होती. त्यानंतर स्टोक्सने शानदार कमबॅक केले. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेमध्ये बेन स्टोक्सने सर्वाधित विकेट्स घेतल्या आहेत. या मालिकेदरम्यान त्याने १२९ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करत १७ विकेट्स घेतल्या आहेत. मँचेस्टर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी स्टोक्सच्या हॅमस्ट्रिंगला पुन्हा दुखापत झाल्याने इंग्लंडचे टेन्शन वाढले होते. तो रिटायर हर्ट होऊन मैदानातून बाहेर पडला होता. पण चौथ्या दिवशी पुनरागमन करत बेन स्टोक्सने १४१ धावांची शानदार खेळी केली. पण दुसऱ्या डावात स्टोक्स गोलंदाजीसाठी आला नाही.

Ind vs Eng 4th Test
Jasprit Bumrah Retirement : टीम इंडियाला मोठा हादरा! जसप्रीत बुमराह कसोटीतून निवृत्ती घेणार?

चौथा दिवस संपल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये इंग्लंडचे सहाय्यक प्रशिक्षक मार्कस ट्रेस्कोथिक यांना बेन स्टोक्सच्या दुखापतीबाबत विचारण्यात आले. सध्या त्याबद्दल काहीही सांगणे कठीण आहे. स्टोक्सला खूप वेदना होत आहेत. गेल्या काही आठवड्यात त्याच्यावर खूप कामाचा ताण होता. मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याला वेदना जाणवत होत्या. रात्रभर विश्रांती घेतल्यानंतर त्याला आराम मिळेल. पण तो गोलंदाजी करेल की नाही हे सांगता येणार नाही, असे वक्तव्य इंग्लंडच्या प्रशिक्षकांनी केले होते.

Ind vs Eng 4th Test
Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

मँचेस्टर कसोटीमध्ये भारताने प्रथम फलंदाजी करत ३५८ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडच्या संघाने तब्बल ६६९ धावांचे डोंगर उभारला. इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने शतकीय भागीदारी केली. त्यानंतर जो रूटने १५० धावा आणि बेन स्टोक्सने १४१ धावा केल्या. कसोटी सामन्यात पाच विकेट्स आणि शतकीय खेळी करत बेन स्टोक्सने इतिहास रचला. इंग्लंडने ३११ धावांची आघाडी घेतल्यानंतर केएल राहुल-यशस्वी जैस्वाल फलंदाजीसाठी आले. यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन एकाच ओव्हरमध्ये शून्यावर बाद झाले. त्यानंतर केएल राहुल (८७ धावा) आणि शुभमन गिल (७८ धावा) यांनी भारताचा डाव सावरला.

Ind vs Eng 4th Test
Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com