Mohammed Siraj x
Sports

Ind Vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीपूर्वी मोहम्मद सिराजने दिली गुडन्यूज, म्हणाला...

India Vs England : वर्कलोड मॅनेजमेंटमुळे भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराह सामील होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्नाचे उत्तर मोहम्मद सिराजने पत्रकार परिषदेत दिले आहे.

Yash Shirke

India Vs England 4th Test : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना २३ जुलैपासून मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पत्रकार परिषद घेऊन टीम इंडियाच्या प्लेईंग ११ बद्दल मोठी माहिती दिली आहे. संघातील बरेचसे खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे प्लेईंग ११ मध्ये बदल निश्चित आहे, असे सिराजने म्हटले आहे.

मँचेस्टर कसोटी सुरु होण्यापूर्वी मोहम्मद सिराजने पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा केली. भारतासाठी करो वा मरो अशी स्थिती असणाऱ्या मँचेस्टर कसोटीमध्ये जसप्रीत बुमराह सहभागी होणार आहे, अशी माहिती सिराजने दिली आहे. भारतीय संघ मालिकेमध्ये १-२ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिकेत टिकून राहायचे असल्यास मँचेस्टर कसोटी जिंकणे भारतासाठी आवश्यक आहे.

जस्सी भाई तो खेलेंगे!

'जसप्रीत बुमराह चौथी कसोटी खेळणार आहे. आकाश दीपला कंबरेचा त्रास आहे. त्याने आज गोलंदाजी केली, त्याच्या दुखापतीवर फिजिओ लक्ष ठेवून आहेत. संघातील संयोजन बदलत आहे, त्यासोबत चांगल्या कामगिरीची आवश्यकता आहे. आमची योजना सोपी आहे, आम्हाला आमच्या आघाडीवर टिकून राहायचे आहे', असे वक्तव्य मोहम्मद सिराजने पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.

मँचेस्टरमध्ये भारतीय कसोटी संघाची कामगिरी फारशी चांगली नाहीये. भारताने आतापर्यंत मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर ९ कसोटी सामने खेळले आहेत. यातील एकही सामना भारताने जिंकलेला नाही. एजबॅस्टनमध्येही असाच नकोसा विक्रम होता. पण तो विक्रम मोडत शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने इतिहास घडला. त्याच प्रमाणे, मँचेस्टरमध्येही टीम इंडिया ऐतिहासिक विजय मिळवेल अशी चाहत्यांना आशा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kandi Pedha Recipe : साताऱ्याचा स्पेशल कंदी पेढा घरी कसा बनवावा? वाचा सीक्रेट रेसिपी

Filmcity Makeup Artist : मुलीमुळे आईचा झाला भंडाफोड, आर्टिस्ट नवऱ्याला संपववलं होतं, पत्नी-प्रियकराच्या कटाचा पर्दाफाश

Bigg Boss 19 : मराठमोळ्या अभिनेत्याची सलमान खानच्या 'बिग बॉस 19'मध्ये एन्ट्री? स्वत:च केला खुलासा

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाच्या आमदाराला राधाकृष्ण विखे पाटील यांची महायुतीत येण्याची खुली ऑफर

सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का! खासदार विशाल पाटलांच्या कट्टर समर्थकांचा भाजपात प्रवेश

SCROLL FOR NEXT