
मँचेस्टर कसोटीआधी टीम इंडियाला मोठा दिलासा
भारताचा स्टार फलंदाज रिषभ पंतच्या फिटनेसबाबत अपडेट
चौथ्या कसोटीआधी रिषभ पंत तंदुरुस्त?
सरावात विकेटकीपिंग करताना दिसला रिषभ पंत
Rishabh Pant injury update ahead of Manchester Test : इंग्लंडच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी करणाऱ्या रिषभ पंतच्या फिटनेसबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना दुखापतीनं गाठलंय. अर्शदीप सिंग हा सामन्यातून बाहेर झालाच आहे. त्यात नितीशकुमार रेड्डी हा संपूर्ण मालिकेतूनच बाहेर झाला आहे. हाताच्या दुखापतीमुळं रिषभ पंतच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह होते. पण आता तो चौथ्या कसोटी सामन्यात मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. तो संघात एकाचवेळी तिन्ही आघाड्यांवर मोर्चा सांभाळू शकतो.
मँचेस्टर कसोटीत विजय मिळवून मालिकेत कमबॅक करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. हे आव्हान पार करण्याआधीच खेळाडूंच्या दुखापतीचा मोठा अडथळा संघासमोर निर्माण झाला. वेगवान गोलंदाजांना दुखापतीमुळं संघाबाहेर जावं लागलंय. अष्टपैलू नितीशकुमार रेड्डी हा तर मालिकेतूनच बाहेर झालाय. रिषभ पंत चौथ्या सामन्यात खेळणार का, असा प्रश्न होता. पण त्याच्या फिटनेसबाबत दिलासा देणारी अपडेट आली आहे.
रिषभ पंतला लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशीच दुखापत झाली होती. विकेटकिपिंग करताना पंतच्या हाताच्या बोटांना लागलं होतं. त्यामुळं तिसऱ्या कसोटी सामन्यात तो यष्टीरक्षण करताना दिसला नाही. ध्रुव जुरेल यानं त्याची जबाबदारी सांभाळली होती. मात्र, पंतनं दोन्ही डावांमध्ये फलंदाजी केली होती. त्यात एक अर्धशतकी खेळीही केली होती. पण खेळताना त्याला होणाऱ्या वेदना दिसून येत होत्या.
पंत मँचेस्टरमध्ये खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात पूर्णपणे फिट होऊन खेळणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. फक्त फलंदाजी करून यष्टीरक्षणाची जबाबदारी ध्रुव जुरेलला दिली जाणार का? अशी चर्चाही होती. एकूणच रिषभ पंतच्या खेळण्याबाबत साशंकता होती. ती आता दूर झाली आहे. टीम इंडियाला दिलासा देणारी अपडेट आली आहे. २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या या सामन्याच्या दोन दिवस आधीच ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर रिषभ पंत हा विकेटकीपिंगचा सराव करताना दिसून आला. त्यामुळं तो चौथ्या कसोटी खेळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीच पंतच्या हाताच्या बोटांना दुखापत झाली होती. त्यामुळे तो विकेटकीपिंग करू शकला नाही. त्यानंतरच्या दिवसांत पहिल्यांदाच रिषभ पंत कीपिंगचा सराव करताना दिसला. रिपोर्ट्सनुसार, पंतच्या ज्या बोटांना दुखापत झाली होती, त्यावर अजूनही पट्टी लावलेली होती. मँचेस्टर कसोटीत विकेटकीपर आणि फलंदाज म्हणून पंत खेळू शकला तर, प्लेइंग इलेव्हनची निवड प्रक्रिया प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल या दोघांसाठी सोपी होणार आहे. सामना सुरू होण्याआधी कर्णधार आणि प्रशिक्षकांचं त्याच्या फिटनेसकडे लक्ष असेलच, पण स्वतः पंत देखील पुरेपूर काळजी घेताना दिसेल. त्याच्या प्लेइंग इलेव्हनमधील समावेशाबाबतचा निर्णय सामन्याच्या दिवशीच होण्याची शक्यता आहे.
रिषभ पंतच्या दुखापतीबाबत सध्या काय अपडेट आहे?
रिषभ पंत आता पूर्णपणे तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर असून तो मँचेस्टर कसोटीत खेळण्याची शक्यता आहे. त्याने ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर विकेटकिपिंगचा सराव सुरू केला आहे.
मागील कसोटीत रिषभ पंत खेळला होता का?
पंतने फलंदाजी केली होती, पण दुखापतीमुळे विकेटकिपिंग केली नव्हती. त्याऐवजी ध्रुव जुरेलने यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडली होती.
पंतला नेमकी कशी दुखापत झाली होती?
लॉर्ड्स कसोटीत विकेटकिपिंग करताना पंतच्या हाताच्या बोटांना लागलं होतं.
चौथ्या कसोटीत पंत खेळणार का?
अद्याप बीसीसीआयने अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र सरावात त्याने विकेटकिपिंग केल्यामुळे तो मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.
कोणते खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत?
अर्शदीप सिंग मँचेस्टर कसोटीमधून बाहेर आहे. तर अष्टपैलू नितीशकुमार रेड्डी संपूर्ण मालिकेतूनच बाहेर झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.