jasprit bumrah saam tv news
Sports

Jasprit Bumrah News: तिसऱ्या कसोटीतून जसप्रीत बुमराह बाहेर? वाचा कारण

India vs England 3rd Test: राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Ankush Dhavre

India vs England 3rd Test, Jasprit Bumrah:

राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र जसप्रीत बुमराह अजूनही संघासोबत जोडला गेलेला नाही. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार तो सराव सत्रात देखील सहभाग घेत नाहीये. (Jasprit bumrah news in marathi)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना झाल्यानंतर भारतीय खेळाडूंना विश्रांती करण्यासाठी १० दिवसांचा अवधी मिळाला. ६ दिवसांच्या विश्रांतीनंतर ११ फेब्रुवारीला भारतीय खेळाडू राजकोटमध्ये दाखल झाले होते. तेव्हापासूनच खेळाडूंनी कसून सराव करायला सुरुवात केलीय.

मात्र बुमराह काही सराव करताना दिसून आलेला नाही. दुसरा सामना झाल्यानंतर अशी चर्चा सुरू होती की, बुमराहला तिसऱ्या कसोटीतून विश्रांती दिली जाऊ शकते. मात्र दुसऱ्या सामन्यानंतर १० दिवसांची विश्रांती मिळाली. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात बुमराह खेळणार असल्याची शक्यता वाढली. असं म्हटलं जात आहे की, तिसऱ्या कसोटीनंतर चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. (Cricket news in marathi)

तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठे धक्के बसले आहेत. विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुलसारखे प्रमुख फलंदाज या सामन्याचा भाग नसणार आहेत. त्यामुळे भारतीय संघाची फलंदाजी कमकुवत झाली आहे. संघाची फलंदाजी मजबूत करण्यासाठी सरफराज खान आणि देवदत्त पडीक्कलसारख्या युवा खेळाडूंना संघात स्थान दिले जाऊ शकते.

उर्वरित ३ कसोटी सामन्यांसाठी असा आहे भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT