Team India News: BCCI ॲक्शन मोडमध्ये! या एकाच अटीवर अय्यर, इशान अन् पंड्याला मिळणार टीम इंडियात स्थान

BCCI On Shreyas Iyer And Ishan Kishan: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी इशान किशनला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
ishan kishan with shreyas iyera
ishan kishan with shreyas iyerayandex
Published On

Ishan Kishan And Shreyas Iyer Update: 

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी इशान किशनला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. केएस भरत,ध्रुव जुरेलला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान दिलं गेलं.

मात्र इशान किशनला (Ishan Kishan) दुर्लक्ष केलं गेलं. दरम्यान या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याने मानसिक थकवा जाणवत असल्याचा हवाला देत विश्रांतीची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत बीसीसीआयने त्याला विश्रांती दिली.

मात्र नुकताच तो आयपीएल (IPL) स्पर्धेसाठीचा सराव करताना दिसून आला आहे. यावरुन तो पूर्णपणे फिट असल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान इशान किशन आणि श्रेयस अय्यरबाबत बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.

येत्या काही दिवसात आयपीएल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेपूर्वी देशात रणजी ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरु आहे. संघाबाहेर असलेला इशान किशन रणजी ट्रॉफी सोडून आयपीएल स्पर्धेची तयारी करताना दिसून आला आहे. त्यामुळे बीसीसीआयने अॅक्शन घेत १६ फेब्रुवारीपूर्वी होणाऱ्या सामन्यापूर्वी आपआपल्या संघात सामील होण्याचा सल्ला दिला आहे. श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) देखील भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी रणजी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करुन दाखवावी लागणार आहे. (Cricket news in marathi)

ishan kishan with shreyas iyera
IND vs ENG 3rd Test: सरफराजचं पदार्पण होणार! या युवा खेळाडूलाही मिळणार प्लेइंग ११ मध्ये स्थान

इशान किशनने मानसिक थकवा जाणवत असल्याचा हवाला देत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन माघार घेतली होती. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेतही त्याला संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली,त्या संघातही इशान किशनचा समावेश नव्हता. राहुल द्रविडला इशान किशनबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ते म्हणाले होते की, इशान किशनला संघात कमबॅक करायचं असेल तर त्याला रणजी क्रिकेट खेळावं लागेल.

ishan kishan with shreyas iyera
IND vs ENG Test Series: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेत कोण मारणार बाजी ?दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी

या खेळाडूंसाठीही नियम लागू.

इशान किशन आणि श्रेयस अय्यरसह क्रुणाल पंड्या आणि दीपक चाहरला देखील हा नियम लागु होणार आहे. हे दोघेही खेळाडू कसोटी क्रिकेटपासून दूर आहेत. तरीदेखील बीसीसीआयने हा नियम लागु केला आहे. मात्र हा नियम विराट कोहलीला लागु होणार नाही. कारण त्याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com