India Vs England : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. या सामन्यामध्ये संघ व्यवस्थापनाने जसप्रीत बुमराहला प्लेईंग ११ मधून बाहेर ठेवले आहे. कुलदीप यादवला खेळण्याची संधी मिळालेली नाही.
टॉस गमावल्यानंतर शुभमन गिलने प्लेईंग ११ ची माहिती दिली. आमच्या संघात ३ बदल करण्यात आले आहेत. नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि आकाश दीप यांना संघात घेण्यात आले आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे जसप्रीत बुमराह खेळणार नाही. त्याला चांगला ब्रेक मिळणार आहे. जेव्हा तिसरा सामना लॉर्ड्सवर होईल तेव्हा बुमराहचा चांगला वापर करु, असे शुभमन गिलने म्हटले.
टीम इंडियाने मुख्य फिरकीपटू कुलदीप यादव याच्या ऐवजी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला प्लेईंग ११ मध्ये समाविष्ट केले आहे. कर्णधार शुभमन गिलने कुलदीप यादवला न खेळवण्याबाबतही विधान केले. आम्ही कुलदीपला खेळवण्याचा विचार करत होतो, पण पहिल्या कसोटी सामन्यात आमच्या खालच्या फळीतील खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली नव्हती. म्हणून आम्ही कुलदीपऐवजी सुंदरची निवड केली.
२० जून रोजी लीड्समधील हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला गेला. या सामन्याच्या दोन्ही डावात भारतीय खेळाडूंनी एकूण ५ शतके झळकावली. चौथ्या डावात इंग्लंडसमोर ३७१ धावांचे लक्ष्य होते. पण खराब गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यांच्यामुळे भारताने हा सामना गमावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.