Shocking : संतापजनक! दुचाकीवरून पाठलाग केला, निर्जनस्थळी नेवून ९वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

Tamilnadu Crime News : तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यात नववीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Shocking : संतापजनक! दुचाकीवरून पाठलाग केला, निर्जनस्थळी नेवून ९वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार
Tamilnadu Chengalpattu 9th Class Student Girl Gang RapeSaam Tv
Published On
Summary
  • तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यात धक्कादायक घटना

  • नववीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

  • दोन आरोपींना अटक

  • पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू

Tamilnadu Chengalpattu 9th Class Student Girl Gang Rape तामिळनाडूमध्ये नववीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी ही मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. पीडित मुलगी दोन मित्रांसोबत दुचाकीवरून जात असताना. पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवरून येणाऱ्या दोन तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. पाठलाग करताना संबंधित पीडित मुलीच्या मित्रांची बाईक घसरून त्यांचा अपघात झाला.

Shocking : संतापजनक! दुचाकीवरून पाठलाग केला, निर्जनस्थळी नेवून ९वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार
Auto Rickshaw Permits : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय! नवीन रिक्षा परवान्यांना स्थगिती; नेमकं कारण काय?

याच वेळेस पाठलाग करणाऱ्या तरुणांनी दुचाकी बाजूला थांबवून पीडितेच्या मित्रांना धमकावून तिथून पळ काढण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यानंतर मुलीला निर्जन स्थळी नेवून तिच्यावर सामूहिकरीत्या बलात्कार करण्यात आला. यानंतर मुलीला तिथेच सोडून नराधम आरोपींनी पळ काढला. मुलीने गंभीर अवस्थेत घर गाठल्यानंतर तिने पालकांना घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं.

Shocking : संतापजनक! दुचाकीवरून पाठलाग केला, निर्जनस्थळी नेवून ९वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार
Maternity Leave : कोणताही नियम महिलेला मातृत्व रजा घेण्यापासून रोखू शकत नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

संतप्त पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणी तातडीने तपास कार्याला सुरुवात केली. काही तासातच पोलिसांनी आरोपीला अटक केली असून याप्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे. तसेच मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com