Jofra archer returns to team before edgbaston match x
Sports

Ind Vs Eng 2nd Test : दुसऱ्या सामन्याआधी यू-टर्न! संघाला सोडून गेलेला जोफ्रा आर्चर पुन्हा परतला; इंग्लंडच्या प्लेईंग ११ मध्ये बदल होणार?

Ind Vs Eng : भारत आणि इंग्लंड हे दोन संघ उद्या एजबॅस्टन स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. इंग्लंडने सामन्यातील प्लेईंग ११ ची घोषणा केली आहे. भारताच्या ११ शिलेदारांची घोषणा सामन्यापूर्वी होईल असे म्हटले जात आहे.

Yash Shirke

India Vs England : बर्मिंगहॅममध्ये एजबॅस्टन स्टेडियमवर उद्या २ जुलै रोजी भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील दुसरा सामना सुरु होणार आहे. काल ३० जून रोजी इंग्लंडने या सामन्यातील ११ शिलेदारांची घोषणा केली. प्लेईंग ११ मध्ये वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा समावेश नसल्याने चर्चा सुरु झाल्या. या सामन्यामधून आर्चर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता.

जोफ्रा आर्चर काही कौटुंबिक कारणांमुळे इंग्लंडचा संघ सोडून गेला होता. सराव सत्रादरम्यानही जोफ्रा आर्चर दिसला नव्हता. त्यानंतर काल इंग्लंडच्या संघाने प्लेईंग ११ ची घोषणा केली. लीड्स कसोटीमध्ये जे ११ खेळाडू सहभागी झाले होते, त्याच खेळाडूंना एजबॅस्टन कसोटीमध्ये खेळण्याची संधी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. कौटुंबिक अडचणींमुळे जोफ्रा आर्चर सामना खेळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

आता एजबॅस्टन कसोटीपूर्वी जोफ्रा आर्चर बर्मिंगहॅममध्ये इंग्लंड संघात पुन्हा सामील झाला असल्याची माहिती समोर आले आहे. रेव्हस्पोर्ट्झने दिलेल्या माहितीनुसार, जोफ्रा सोमवारी (३० जून) इंग्लंडच्या संघाला सोडून गेला होता. आता तो आज मंगळवारी (१ जुलै) बर्मिंगहॅममध्ये परतला आहे. परतल्यानंतर आर्चरने नेटमध्ये सराव देखील केला. जोफ्रा आर्चर परतल्याने इंग्लंडच्या प्लेईंग ११ मध्ये बदल होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जोफ्रा आर्चर सुमारे चार वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत होता. दुखापतीमुळे तो बराच काळ इंग्लंडच्या कसोटी संघाबाहेर होता. त्याने आपला शेवटचा कसोटी सामना भारताविरुद्ध खेळला होता. आता पुन्हा एकदा भारताविरुद्ध कसोटी फॉरमॅटमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळणार होती. आता सामन्यात खेळून आर्चर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयाबाहेर पत्ते खेळून आंदोलन

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे हेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतात; शरद पवार गटाच्या आमदाराचा दावा

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत? रवींद्र चव्हाण म्हणाले,राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो | VIDEO

Maharashtra Politics : नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार? बडा नेता भाजपच्या वाटेवर, पक्षांतरावर नेत्याचं मोठं वक्तव्य

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! मुसळधार पावसामुळे ब्रिटीशकालीन धरण ९२ टक्के भरलं, पाणीचिंता मिटणार?

SCROLL FOR NEXT