hardik pandya twitter
Sports

IND vs ENG 2nd ODI: इतका सोपा कॅच कोण सोडतं? अक्षरने 'हलवा' कॅच सोडल्यानंतर हार्दिकही भडकला - VIDEO

Axar Patel Dropped Catch: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यात अक्षर पटेलने सोपा झेल सोडला. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना कटकमध्ये सुरु आहे. या सामन्यातही इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवत इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. सुरुवातीचे १० षटक इंग्लंडचे फलंदाज अॅक्शन मोडवर होते.

मात्र सहाव्या षटकात भारतीय संघाला विकेट घेण्याची संधी मिळाली होती. फिल सॉल्ट स्वरुपात भारतीय संघाला पहिला विकेट मिळाला असता. मात्र भारतीय संघातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेल्या अक्षर पटेलने सोपा झेल सोडला आणि फिल सॉल्टला जिवदान मिळालं. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

नेमकं काय घडलं?

तर झाले असे की, इंग्लंडचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. इंग्लंडची फलंदाजी सुरु असताना रोहित शर्माने सहावे षटक टाकण्याची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवली. या षटकात हार्दिकला हवी तशी सुरुवात करता आली नाही. पहिलाच चेंडू त्याने वाईड टाकला.

त्यानंतर फिल सॉल्टने हार्दिकच्या गोलंदाजीवर डीप पॉईंटच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू सरळ सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या अक्षर पटेलच्या हातात गेला. झेल तसा सोपा होता. पण, अक्षरला हा झेल पकडता आला नाही. हा झेल सुटल्यानंतर चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

इंग्लंडची दमदार सुरुवात

या सामन्यातही इंग्लंडने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून फिल सॉल्ट आणि बेन डकेट ही जोडी मैदानावर आली. दोघांनी सलामीला फलंदाजी करताना या जोडीने ८१ धावा जोडल्या. फिल सॉल्टने २६ धावांची खेळी केली. तर बेन डकेटने ६५ धावा जोडल्या. त्यानंतर जो रुट आणि हॅरी ब्रुक यांनी मिळून डाव सांभाळला.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल (उपकर्णधार), लोकेश राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, वरूण चक्रवर्थी, मोहम्मद शमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर भीषण अपघात,२ वर्षीय मुलीचा मृत्यू तर ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला, टोमॅटोने भरलेला पिकअप उलटला

Mumbai Bomb Threat: मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

SCROLL FOR NEXT