
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी ०९ फेब्रुवारी कटक येथे रंगणार आहे. पहिल्या सामन्यात ४ गडी राखून भारताने इंग्लंडवर विजय मिळवला होता.पहिल्या सामन्यात विश्रांतीनंतर अनुभवी फलंदाज विराट कोहली दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करेल. अशी माहिती संघाचा उपकर्णधार शुभमन गिलने दिली. गिलने कोहलीच्या फिटनेस संबधित सुरू असलेल्या सर्व शंका फेटाळून लावल्या. आणि दुसऱ्या वनडे सामन्यात तो पुनरागमन करेल असे सांगितले. रविवारी कटकमधील बाराबती स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
विराट कोहली दुसरा सामना खेळणार
पहिल्या सामन्यात ८७ धावा करून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शुभमन गिलने डिज्नी हॉटस्टारला सांगितले की, 'विराट कोहलीची दुखापत गंभीर नाही. बुधवारी त्याने चांगली प्रॅक्टिस केली. पण गुरुवारी सकाळी त्याच्या गुडघ्यात सूज आली. म्हणून तो पहिला सामना खेळू शकला नाही. पण तो दुसऱ्या वनडे सामन्यात नक्कीच कमबॅक करेल.
गुडघ्यात सूज आल्यामुळे कोहली खेळू शकला नाही
विराट कोहलीच्या उजव्या गुडघ्यात सूज आल्यामुळे तो पहिला सामना खेळू शकला नाही. त्याच्या जागी श्रेयस अय्यरचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला होता. कोहलीच्या गैरहजरीमुळे भारतीय संघाची चिंता वाढली होती. परंतु संघाच्या विजयानंतरही विराट कोहलीच्या पुनरागमनानंतर कोणाला संघाबाहेर जावं लागेल हा महत्वाचा प्रश्न टिम मॅनेजमेंट समोर उपस्थित झाला आहे. १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया दुबईला रवाना होणार आहे.
कोणाला बेंचवर बसावे लागणार?
विराट कोहली दुसरा वनडे सामना खेळणार असल्याची माहिती समोर येत आहे. टिममध्ये कोहलीच्या पुमरागमनाने कोणाला बेंचवर बसवावे लागेल? हा महत्वाचा प्रश्न कर्णधार रोहित शर्मा आणि टिम मॅनेजमेंट समोर उपस्थित झाला आहे. यशस्वी जयस्वाल किंवा श्रेयस अय्यर हे संभाव्य पर्याय आहेत. यशस्वी जायस्वालने गेल्या वनडे सामन्यात पदार्पण केले होते. आणि आपली छाप पाडण्यापूर्वीच त्याला वगळणे हा कठोर निर्णय असू शकतो. ऋषभ पंतचीही संघात परतण्याची शक्यता कमीच दिसते कारण अक्षर पटेलने उत्तम फलंदाजी करत अर्धशतक झळकावले होते.
विराट कोहली संघाबाहेर गेल्यामुळे श्रेयस अय्यरला संधी मिळाली. सामना जिंकणारी खेळी खेळून, अय्यरने सिद्ध केले की तो या फॉरमॅटमध्ये खेळण्यास पात्र आहे. फलंदाजाने ३६ बॅालमध्ये नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या. पदार्पण करणाऱ्या यशस्वी जयस्वालने २२ चेंडूत १५ धावा केल्या. कोहलीच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या शुभमन गिलने ८७ धावा केल्या.
भारताची संभाव्य प्लेइंग-११
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.