team india saam tv news
Sports

IND vs ENG 1st Test 1st Inning: बॅझबॉलवर टीम इंडियाचे फिरकी गोलंदाज पडले भारी! इंग्लंडचा पहिला डाव २४६ वर संपुष्टात

India vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे.

Ankush Dhavre

IND vs ENG 1st Test, 1st Inning:

इंग्लंडची बॅझबॉल प्लानिंग भारतीय खेळपट्टीवर फुसका बॉम्ब ठरली आहे. पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात इंग्लंडचा डाव अवघ्या २४६ धावांवर आटोपला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारताच्या फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज लोटांगण घालताना दिसून आले आहेत.

फिरकी गोलंदाजीच्या जाळ्यात अडकले इंग्लंडचे फलंदाज..

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णय सार्थ ठरवत इंग्लंडच्या सलामी जोडीने संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. दोघांनी मिळून मोहम्मद सिराजच्या सुरुवातीच्या ४ षटकात २८ धावा चोपल्या.

मात्र त्यानंतर भारतीय फिरकी गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी आले आणि त्यांना इंग्लंडच्या फलंदाजांना पूर्णपणे बॅकफुटवर ढकललं. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना फिरकी गोलंदाज आर अश्विन आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. (Latest sports updates)

इंग्लंडकडून बेन स्टोक्सकडून एकाकी झुंज...

इंग्लंडचा बॅझबॉल या डावात कामी आला नाही. कारण इंग्लंडला या डावात मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. इंग्लंडकडून फलंदाजी करताना बेन स्टोक्सने सर्वाधिक ७० धावांची तुफानी खेळी केली. तर बेन डकेटने ३५, जॉनी बेअरस्टोने ३७, जो रुटने २९ धावांची खेळी केली.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, के एल राहुल, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

इंग्लंड:

जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जॅक लीच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

SCROLL FOR NEXT