भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ झाला आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या जॅक क्रॉली आणि बेन डकेटने संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दमदार कमबॅक केलं. दरम्यान सामन्यातील सुरुवातीच्या २० षटकातच चेंडू बदलावा लागला आहे.
का बदलावा लागला चेंडू?
तर झाले असे की, इंग्लंडच्या फलंदाजांकडून होत असलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे चेंडूचा आकार बदलला. हुप टेस्ट केल्यानंतर अंपायरने चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला. कसोटी क्रिकेटमध्ये जेव्ह कर्णधार चेंडूचा आकार बदलल्याची तक्रार करतात त्यावेळी अंपायरकडून हुप टेस्ट केली जाते.
या हुप टेस्टमध्ये अंपायरला जर चेंडूचा आकार बदलला आहे असं जाणवलं की, चेंडू बदलून दिला जातो. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात १९ षटकं झाल्यानंतरच चेंडू बदलावा लागला आहे. (Cricket News In Marathi)
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकली आणि भारतीय संघाला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करत असलेल्या इंग्लडंने सुरुवातीच्या काही षटकात आक्रमण करत भारतीय गोलंदाजांवर दबाव बनवला.
दोन्ही फलंदाजांनी डावाची सुरुवात करताना वेगवान गोलंदाजांवर चांगलाच दबाव बनवला. मात्र फिरकी गोलंदाज गोलंदाजीला येताच इंग्लंडचे फलंदाज पूर्णपणे बॅकफुटवर गेले. इंग्लंडचे आतापर्यंत १४४ धावांवर ६ फलंदाज माघारी परतले आहेत. दरम्यान भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना आर अश्विन,रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलने प्रत्येकी २-२ गडी बाद केले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.