भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या राजीवर गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
संघातील प्रमुख फलंदाज विराट कोहलीने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी रजत पाटीदारला संघात स्थान दिलं गेलं आहे. त्याला पहिल्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.
गेल्या १२ वर्षांपासून इंग्लंडचा संघ भारतीय संघाला भारतात पराभूत करु शकलेला नाही. त्यामुळे इंग्लंडचा संघ या मालिकेत पूर्ण जोर लावताना दिसून येऊ शकतो.
केव्हा,कधी आणि कुठे पाहता येईल सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनूसार सकाळी ९:३० वाजता सुरु होईल. हा सामना तुन्ही नेटवर्क १८ वर लाईव्ह पाहू शकता.
तर जियो सिनेमावर फुकटात लाईव्ह पाहता येणार आहे. या सामन्याचा आनंद तुम्ही हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये घेऊ शकता.जियो सिनेमा अॅपसह तुम्ही हा सामना जियो सिनेमाच्या वेबसाईटवर जाऊनही लाईव्ह पाहू शकता. (Latest sports updates)
असं आहे संपूर्ण वेळापत्रक..
या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांचा थरार रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना २५ जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. तर दुसऱ्या कसोटी सामन्याला २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टनममध्ये प्रारंभ होणार आहे.
मालिकेतील तिसरा कसोटी सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये रंगणार आहे. २३ फेब्रुवारीपासून रांचीमध्ये चौथ्या कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. तर मालिकेतील अंतिम सामना ७ मार्चपासून धर्मशाळेच्या मैदानावर खेळला जाणार आहे. हे सर्व सामने भारतीय वेळेनूसार सकाळी ९:३० वाजता सुरु होणार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.