मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

Minor Gang Creates Ruckus at Kurla Garden: मुंबईत अल्पवयीन गार्डन गँगनं अक्षरशा धुडगूस घातलाय... एका तरुण- तरुणीला मारहाण करत या गँगनं दहशत माजवलीय? नेमकं प्रकरण काय आहे? कुर्ल्यातील टवाळखोर अल्पवयीन मुलांना इतका माज कुठून आला? पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून...
MUMBAI KURLA GARDEN GANG
MUMBAI KURLA GARDEN GANGsaam tv
Published On: 

हा व्हिडिओ युपी-बिहारचा नव्हे तर आपल्या मुंबईतील कुर्ल्यातला आहे... मुंबईसारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शहरात भरदिवसा अल्पवयीन तरुणांची ही गार्डन गँग एका तरुणाला आणि तरुणीला बेदम मारहाण करतेय...एक दोन नव्हे तर तब्बल 10 अल्पवयीन तरुण या कधी बेल्टनं तर कधी काठीनं तरुणावर हल्ला करतायत...हे कमी होतं की काय म्हणून या गँगनं तरुणीलाही लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात...

कुर्ल्यात तरुण-तरुणीला मारहाण

कुर्ल्यातील पालिकेच्या प्रमोद महाजन उद्यानात तरुण-तरुणी फोटो काढत होते

यावेळी 8 ते 10 अल्पवयीन मुलांनी तरुण- तरुणीला विनाकारण शिवीगाळ सुरु केली..

तरुण- तरुणीनं त्यांनाविरोध करताच तरुणाच्या पाठित काठीनं मारहाण करण्यात आली

तरुणीला देखील त्या 8-10 मुलांनी मारहाण केलीय

20 नोव्हेंबरला घडलेल्या घटनेनंतर तरुण-तरुणीनं आता पोलिसांत तक्रार दाखल केलीय...

याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल केला असून 6 अल्पवयीन आरोपींना बालसुधार गृहात पाठवण्यात आलंय.

या मारहाणीचा व्हिडिओ समोर येताच संपूर्ण घाटकोपर आणि कुर्ला परिसरात संतापाची लाट उसळलीय...या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं असून, बजरंग दल आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत अल्पवयीन गँगविरोधात आक्रमक भूमिका घेतली...मुळात सार्वजनिक उद्यानातच दहशत माजवण्याचा हा मस्तवालपणा अल्पवयीनं मुलांमध्ये नेमका येतो कुठून? जर तरुण-तरुणी सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य नागरिकांचं काय? आता अल्पवयीन असल्यानं मारहाण केलेल्या मुलांना कदाचित पोलिसांच्या कठोर कारवाईला सामोरे जावं लागणार नाही...मात्र गुंडगिरी करण्याची ही मस्ती येते कुठून? लहान वयातचं अशा विकृत पद्धतीनं एखाद्याला मारहाण करणं कितपत योग्य आहे? हा खरा प्रश्न आहे...मात्र यांसारख्या टवाळखोरांना पोलिसांनी अशी जरब बसवायला हवी की पुन्हा कुणाचीही असं कृत्य करण्याची हिंमत होणार नाही....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.