shubman gill twitter
Sports

IND vs BAN Highlights: गिलने पुन्हा जिंकलं 'दिल', बांगलादेशचा हार्टब्रेक करत टीम इंडियाची विजयी सुरुवात

India vs Bangladesh Highlights: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली आहे.

Ankush Dhavre

दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना बांगलादेशने भारतीय संघासमोर २२९ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान फार मोठं नव्हतं. या धावांचा पाठलाग करताना रोहित आणि गिलने दमदार सुरुवात करुन दिली. रोहित माघारी परतला, पण गिलने शेवटपर्यंत किल्ला लढवत भारतीय संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.

जिंकण्यासाठी २२९ धावांचं आव्हान

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २२८ धावा केल्या. भारतीय संघाचा पॉवरपॅक फलंदाजीक्रम पाहिला, तर हे आव्हान फार मोठं नव्हतं. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानावर आली.

दोघांनी मिळून भारताला ताबडतोड सुरुवात करुन दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. मात्र रोहित शर्मा ४१ धावांवर माघारी परतला. त्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी आला. विराट कोहलीकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र विराट नको तो शॉट खेळून २२ धावांवर माघारी परतला. चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी आला. मात्र श्रेयसला या संधीचा फायदा घेता आला नाही. श्रेयस १५ धावांवर माघारी परतला.

लेफ्टी- रायटी कॉम्बिनेशन म्हणून अक्षर पटेल फलंदाजीला आला. मात्र अक्षर पटेललाही मोठी खेळी करता आली नाही. तो अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. भारतीय संघाला १४४ धावांवर चौथा धक्का बसला. त्यानंतर गिल आणि राहुलने महत्वपूरिण भागीदारी करुन भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

बांगलादेशने केल्या २२८ धावा

या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशने ४९.४ षटकात २२८ धावा केल्या. बांगलादेशकडून फलंदाजी करताना तोहिद हृदोयने सर्वाधिक १०० धावांची खेळी केली. तर जाकेर अलीने ६८ धावा चोपल्या. या दोघांनी मिळून १५४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर बांगलादेशने २०० धावांचा पल्ला गाठला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT