IND vs BAN, 1st Inning: हृदोयने हृदय जिंकलं! भारताकडून शमीने 'पंजा' खोलला; जिंकण्यासाठी इतक्या धावांची गरज

India vs Bangladesh 1st Inning Highlights: भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना दुबईत सुरु आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे.
IND vs BAN, 1st Inning: हृदोयने हृदय जिंकलं! भारताकडून शमीने 'पंजा' खोलला; जिंकण्यासाठी इतक्या धावांची गरज
ind vs bantwitter
Published On

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने आपल्या अभियानाला सुरुवात केली आहे. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध सुरु आहे. दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात रोहित शर्माने टॉस गमावला.

बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा डाव २२८ धावांवर आटोपला . तर भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२९ धावांची गरज आहे.

IND vs BAN, 1st Inning: हृदोयने हृदय जिंकलं! भारताकडून शमीने 'पंजा' खोलला; जिंकण्यासाठी इतक्या धावांची गरज
IND vs BAN Live Updates : नंबर वन बॅट्सनची नंबर 1 कामगिरी, भारताचा बांगलादेशवर दमदार विजय

दुबईच्या उकळत्या उन्हात भारतीय गोलंदाज गोलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांना चांगलाचत घाम फोडला. हर्षित राणा, मोहम्मद शमीने भारताला चांगली सुरुवात करुन दिली.

शमीने सौम्य सरकार आणि मेहदी हसन मिराजला स्वस्तात माघारी धाडलं. त्यानंतर हर्षित राणाने कर्णधार नजमूल हुसेन शांतोला बाद करत माघारी धाडलं. उरली सुरलेली कसर अक्षर पटेलने पूर्ण केली. त्याने एकाच षटकात बांगलादेशला २ मोठे धक्के दिले. अक्षरने हसन आणि रहीमला लागोपाठ बाद करत हॅट्रीकची संधी निर्माण केली. मात्र रोहितने सोपा झेल सोडल्यामुळे ही संधी हुकली.

IND vs BAN, 1st Inning: हृदोयने हृदय जिंकलं! भारताकडून शमीने 'पंजा' खोलला; जिंकण्यासाठी इतक्या धावांची गरज
IND vs BAN : अर्शदीप सिंग बाहेर, गंभीरच्या विश्वासूला संधी; पहिल्या सामन्यासाठी भारताचे शिलेदार कोणकोणते?

हृदोय अन् अलीची दीड शतकी भागीदारी..

हृदोय अन् अली या जोडीने भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. दोघांनी मिळून या डावात दीड शतकी भागीदारी केली. हृदोयने आपलं शतक पूर्ण केलं. तर अलीला शतक पूर्ण करता आलं नाही. तो ६८ धावांवर तंबूत परतला. या खेळीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या २०० पार पोहोचवली.

भारतीय गोलंदाज चमकले..

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर हर्षित राणाने ३ आणि अक्षर पटेलने २ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com