
तब्बल १४ महिने भारतीय संघातून बाहेर राहिलेल्या मोहम्मद शमीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात कहर केला आहे. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध पार पडला.
या सामन्यात शमीने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. शमी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० गडी बाद करणारा (चेंडूंच्या बाबतीत) जगातील पहिलाच गोलंदाज ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातील तिसरा फलंदाज बाद करताच शमीने हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.
शमीच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ५१२६ चेंडूंचा सामना करत २०० गडी बाद करण्याचा पल्ला गाठला आहे. असा कारनामा करणारा शमी पहिलाच गोलंदाज ठरला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने ५२४० चेंडूंचा सामना करत हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता.
मुख्य बाब म्हणजे या रेकॉर्डमध्ये टॉप ६ गोलंदाजाच्या यादीत मोहम्मद शमी हा एकटा भारतीय गोलंदाज आहे. तर सामन्यांच्या बाबतीत सर्वात जलद २०० गडी बाद करणारा दुसराच गोलंदाज ठरला आहे. तर पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क या यादीत पहिल्या स्थानी आहे. त्याने १०२ सामन्यांमध्ये हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता.
५१२६ चेंडू - मोहम्मद शमी
५२४० चेंडू - मिचेल स्टार्क
५४५१ चेंडू - सकलेन मुश्ताक
५६४० चेंडू - ब्रेट ली
५७८३ चेंडू - ट्रेंट बोल्ट
५८८३ चेंडू- वकार यूनुस
१०२ सामने - मिचेल स्टार्क
१०४ सामने - मोहम्मद शमी/सकलेन मुश्ताक
१०७ सामने - ट्रेंट बोल्ट
११२ सामने - ब्रेट ली
११७ सामने - एलन डोनाल्ड
६० गडी - मोहम्मद शमी
५९ गडी - जहीर खान
४७ गडी - जवागल श्रीनाथ
४३ गडी - रविंद्र जडेजा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.