arshdeep singh twitter
क्रीडा

IND vs BAN: अर्शदीप सिंगच्या गतीसमोर बांगलादेशचा सुपडा साफ; भारतापुढे माफक आव्हान

Ankush Dhavre

India vs Bangladesh 1st T20I Live: भारत आणि बांगलादेश यांच्यातील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला जोरदार सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना ग्वालियरमध्ये सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशला २० षटकअखेर १२७ धावा करता आल्या आहेत. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२८ धावांची गरज आहे.

भारतीय संघाची शानदार गोलंदाजी

या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सुरुवातीलाच अर्शदीप सिंगने बांगलादेशला दुहेरी धक्का दिला. त्याने परवेजला ८ तर लिटन दास ४ धावांवर बाद करत माघारी धाडलं.

कर्णधार नजमुल शांतोने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र वॉशिंग्टन सुंदरने त्याला २७ धावांवर पॅव्हेलियनची वाट दाखवली. शेवटी मेहदी हसन मिराजने संघाची धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र अर्शदीप सिंगने ४ गडी बाद करत बांगलादेशचा डाव १२७ धावांवर आटोपला.

या दोघांना मिळाली पदार्पणाची संधी

या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये २ स्टार खेळाडूंना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. या सामन्यात आयपीएल गाजवणाऱ्या मयांक यादव आणि नितीश कुमार रेड्डीला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. या दोघांनीही आयपीएल २०२४ स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती,हार्दिक पांड्या, रियान पराग, अर्शदीप सिंग, मयंक यादव

बांगलादेश: लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), परवेझ हुसैन इमॉन, तौहीद ह्रदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहिदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, शरीफुल इस्लाम, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉस हिंदीच्या घरात धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या १६ सदस्यांची नावे

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता ठरला सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

Tirupati Balaji Prasad : तिरुपती बालाजीच्या प्रसादात आढळले किडे?, याआधी लाडूत आढळलेली प्राण्याची चरबी

SCROLL FOR NEXT