Ind Vs Aus Semi Final Winning Prediction Saam Tv
Sports

Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, पण सेमीफायनल जिंकणार कोण? अंदाज आला समोर

Ind Vs Aus Winning Prediction : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पहिल्या सेमीफायनल सामन्याला सुरुवात होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना कोण जिंकत फायनलमध्ये जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Yash Shirke

Ind vs Aus Semi Final : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पहिल्या उपांत्य फेरीला लवकरच सुरुवात होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा पहिला उपांत्य फेरीतला सामना दुबईमध्ये खेळला जाणार आहे. टॉस ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टीव स्मिथने जिंकला आहे. स्मिथने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या चुरशीच्या सामन्याला लवकर सुरुवात होणार आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. गुगलच्या अंदाजानुसार, भारताचा विजय होण्याची शक्यता ६४ टक्के आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या विजयाची शक्यता ३६ टक्के आहे. दोन्ही संघ परिपूर्ण असले तरी गुगलनुसार चॅम्पियन्स ट्रॉफी उपांत्य फेरी सामन्यात भारताचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे.

Ind vs Aus Semi-Final Prediction Champions Trophy 2025

भारताने बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा पराभव करत सेमीफायनल गाठली. भारताच्या विजयी रथासमोर आता बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. आजचा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन भारत वर्ल्डकपचा वचवा काढणार की ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा भारताचा पराजय करणार याकडे क्रिकेटप्रेमी लक्ष वेधून आहेत.

भारताची प्लेईंग ११ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव.

ऑस्ट्रेलियाची प्लेईंग ११ -

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस, अ‍ॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अ‍ॅडम झांपा, तनवीर संघा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT