Champions Trophy Semifinal: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनलमध्ये पाऊस पडला तर...; कोणाला मिळणार फायनलचं तिकीट?

India vs Australia Semi-Final Rain Impact: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आता फक्त तीन सामने शिल्लक आहेत. दरम्यान आतापर्यंत स्पर्धेतील तीन सामन्यांमध्ये पावसाने खेळ केला.
Champions Trophy Semifinal
Champions Trophy Semifinalsaam tv
Published On

आज दुपारी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिला सेमीफायनलचा सामना खेळवला जाणार आहे. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना रंगणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आता फक्त तीन सामने शिल्लक आहेत. दरम्यान आतापर्यंत स्पर्धेतील तीन सामन्यांमध्ये पावसाने खेळ केला. अशातच जर आजच्या सामन्यात पाऊस आला तर काय होईल असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.

ग्रुप स्टेजमध्ये पावसाचा खेळ

ग्रुप स्टेजमध्ये पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर दोन्ही टीम्सना प्रत्येकी एक-एक गुण देण्यात आला होता. जर सेमीफायनलच्या आजच्या सामन्यात असंच घडलं तर? सेमीफायनल आणि फायनलचा सामना या दोन्हीसाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे.

टीम इंडियाने ग्रुप राउंडमधील तिन्ही सामने जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला पराभूत केलंय. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला हरवलं. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान विरुद्धचे सामने पावसामुळे रद्द करण्यात आले.

Champions Trophy Semifinal
India vs Australia semi final Match Live Score: नाद करा पण आमचा कुठं! ऑस्ट्रेलियाला धूळ चारत टीम इंडियाने गाठली फायनल

आजच्या सामन्यात पाऊस पडला तर?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना दुबईमध्ये खेळला जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता नाहीये. मात्र तरीही जर उपांत्य फेरीत पाऊस पडला तर सामना त्याच दिवशी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.

जर हे शक्य नसेल तर सामना ज्या दिवशी थांबवला होता तिथून रिझर्व्ह डेच्या दिवशी पुन्हा सुरू केला जाईल. जर राखीव दिवशीही सामना पूर्ण झाला नाही तर ग्रुप स्टेजमध्ये अव्वल स्थानावर असलेली टीम अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.

Champions Trophy Semifinal
IND vs AUS semi final : आकडे पाहता आज टीम इंडियाच जिंकणार! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलचा कसा आहे भारताचा रेकॉर्ड?

दक्षिण आफ्रिकेलाही होणार फायदा

दुसरी सेमीफायनल पाकिस्तानच्या लाहोरमध्ये खेळवण्यात येणार आहे. या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जर हा सामना राखीव दिवशीही पूर्ण झाला नाही, तर दक्षिण आफ्रिका ग्रुप बीमध्ये मध्ये पहिल्या स्थानावर असल्याने फायनलमध्ये फेरीत पोहोचणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com