IND vs AUS Times Of India
Sports

IND vs AUS: एकमेकांवर डोळे वटारणं पडलं महागात! सिराज-हेडवर ICCची कठोर कारवाई

Siraj And Head Fight : ॲडलेड कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात वादावादी झाली.

Bharat Jadhav

ॲडलेड कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या वाद झाला. चालू सामन्यात दोघांनी एकमेकांना डोळे वटारले होते, त्यांच्या वर्तनाची दखल आयसीसीने घेतली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं जात आहे. ट्रॅव्हिस हेडला बाद केल्यानंतर सिराजने त्याला मैदान सोडण्यास सांगितले. त्यावेळी ट्रॅव्हिस हेडहीला रागाने काहीतरी बोलताना दिसला होता. या घटनेवर आयसीसीने दोन्ही खेळाडूंना कठोर शिक्षा सुनावलीय.

सिराजने ICC आचारसंहितेच्या कलम 2.5 चे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यात त्याला दोषी आढळल्यानंतर सिराजला त्याच्या मॅच फीच्या 20% दंड ठोठावण्यात आलाय. तर हेडवर कारवाई करण्यात आलीय. हेडला मॅच फीच्या २० टक्के दंडही ठोठावण्यात आलीय. आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.13 चे उल्लंघन केल्याबद्दलही तो दोषी आढळला आहे.

सिराज आणि हेडला एक-एक डिमेरिट पॉइंट देण्यात आलेत. मागील काही महिन्यात त्यांचा हा पहिला गुन्हा होता. दरम्यान दोन्ही खेळाडूंनी आपला गुन्हा कबूल केलाय. आपण गैरवर्तन केल्याचं त्यांनी मान्य केलंय. तसेच या दोघांवर पंचानी दंड सुनावला असून त्या दोघांनी तो स्वीकारलाय. सिराज आणि हेड यांच्यातील वादावर ट्रॅव्हिस हेडने प्रतिक्रिया दिलीय. त्याने सिराजला चांगली गोलंदाजी केल्याचे म्हटले होते.

यानंतर हेड आक्रमक झाल्याला पाहायला मिळाले होते. यावर सिराजला विचारल्यानंतर तो म्हणाला की, हेड असं काही म्हणाला नव्हतो, तो खोटं बोलत आहे. दरम्यान वादानंतर दोन्ही खेळाडू मैदानावर एकमेकांसोबत बोलताना दिसले होते. तसेच त्यांनी एकमेकांना अलिंगनही दिले होते.

कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला

सिराज आणि हेड यांच्यातील वादाबद्दल टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला , “त्यावेळी मी स्लिपमध्ये उभा होतो. दोघांमध्ये काय झाले ते मला कळले नाही. जेव्हा ते प्रतिस्पर्धी संघासोबत खेळतात तेव्हा असे प्रकार घडतात. त्यावेळी हेड शानदार फलंदाजी करत होता. आम्हाला त्याची विकेट घ्यायची होती. त्यावेळी आमच्या गोलंदाजांवर दबाव होता. त्याला विकेट मिळाली होती आणि तो सेलिब्रेशन करत होता, असंही कर्णधार रोहित म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT