ICC Test Ranking: जो रुटची बादशाहत धोक्यात! जयस्वालला मागे सोडत या फलंदाजाची दुसऱ्या स्थानी झेप

ICC Test Ranking News In Marathi: आयसीसीने कसोटी फलंदाजांची यादी जाहीर केली आहे. या यादीत इंग्लंडच्या फलंदाजाने यशस्वी जयस्वालला मागे सोडत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
ICC Test Ranking: जो रुटची बादशाहत धोक्यात! जयस्वालला मागे सोडत या फलंदाजाची दुसऱ्या स्थानी झेप
joe root twitter
Published On

इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने बाजी मारली. तर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला. या सामन्यांनंतर आयसीसीने कसोटी फलंदाजांची यादी जाहीर केली आहे.

ज्यात इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट अव्वल स्थानी आहे. तर यशस्वी जयस्वालला मागे सोडत हॅरी ब्रुक दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. हॅरी ब्रुक लवकरच नंबर १ स्थानी पोहचू शकतो.

ICC Test Ranking: जो रुटची बादशाहत धोक्यात! जयस्वालला मागे सोडत या फलंदाजाची दुसऱ्या स्थानी झेप
IND vs AUS, KL Rahul: टीम मॅन! कुठल्या क्रमांकावर खेळायचंय? पत्रकाराच्या प्रश्नावर KL Rahulचं मन जिंकणारं उत्तर

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात हॅरी ब्रुकने शानदार शतकी खेळी केली होती. या खेळीच्या बळावर तो २ पाऊल पुढे सरकत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या यशस्वी जयस्वाल, विराट कोहली आणि शुभमन गिल यांना मोठा धक्का बसला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात जो रुटला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. या सामन्यातील पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला. तर दुसऱ्या डावात त्याला अवघ्या २३ धावा करता आल्या.

ICC Test Ranking: जो रुटची बादशाहत धोक्यात! जयस्वालला मागे सोडत या फलंदाजाची दुसऱ्या स्थानी झेप
IND vs AUS: फॅन्सला नो एन्ट्री! BGT सुरु असताना घेतला मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

रुट फ्लॉप ठरला असला तरीदेखील हॅरी ब्रुकने संघाची जबाबदारी खांद्यावर घेत संघाला विजय मिळवून दिला. त्याने या सामन्यात फलंदाजी करताना १७१ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर इंग्लंडने ८ गडी राखून विजय मिळवला.

कोणता फलंदाज कितव्या स्थानी ?

जो रुट आयसीसी फलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. तर शतकी खेळी करणारा हॅरी ब्रुक दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर भारताचा युवा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल दुसऱ्या स्थानाहून चौथ्या स्थानी सरकला आहे. न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विलियम्सन तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

ICC Test Ranking: जो रुटची बादशाहत धोक्यात! जयस्वालला मागे सोडत या फलंदाजाची दुसऱ्या स्थानी झेप
IND vs AUS: डे - नाईट कसोटीत ३ नव्या खेळाडूंना संधी मिळणार! काय असेल टीम इंडियाचा मास्टरप्लान?

शुभमन गिलचंही झालं नुकसान

विराट कोहली १४ व्या स्थानी पोहोचला आहे. तर शुभमन गिलचंही नुकसान झालं आहे. तो १८ व्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. तर केन विलियम्सन तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डॅरील मिचेल पाचव्या स्थानी पोहोचला आहे. तर रिषभ पंत सहाव्या आणि कामिंदू मेंडिस सातव्या स्थानी पोहोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com