Joe Root: जो रुट बनला इंग्लंडचा 'ऑल टाईम ग्रेट' बॅट्समन! दिग्गज फलंदाजांना सोडलं मागे

Joe Root Record News In Marathi: इंंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पहिल्या कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. या सामन्यात जो रुटने मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे.
Joe Root: जो रुट बनला इंग्लंडचा 'ऑल टाईम ग्रेट' बॅट्समन! दिग्गज फलंदाजांना सोडलं मागे
JOE ROOTTwitter
Published On

Joe Root Record: इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटने गेल्या काही वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये धमाल कामगिरी केली आहे. इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या सामन्यात ७१ धावा करताच त्याने इंग्लंडसाठी मोठा कारनामा करुन दाखवला आहे.

तो इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने इंग्लंडच माजी फलंदाज अॅलेस्टर कुकलाही मागे सोडलं आहे.

रुट फॅब ४ फलंदाजांमध्ये सर्वात आघाडीवर आहे. या फलंदाजाने गेल्या काही वर्षांत अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. त्याने ७१ धावांचा पल्ला गाठताच अॅलेस्टर कुकला मागे सोडलं. अॅलेस्टर कुकच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये १२४७२ धावा करण्याची नोंद आहे.

मात्र आता जो रुटने त्याला मागे सोडलं आहे. लवकरच तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरला मागे सोडू शकतो. सचिनचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्यापासून तो अवघ्या ३४४८ धावा दूर आहे.

Joe Root: जो रुट बनला इंग्लंडचा 'ऑल टाईम ग्रेट' बॅट्समन! दिग्गज फलंदाजांना सोडलं मागे
IND vs BAN: केव्हा, कुठे अन् कधी पाहता येणार दुसरा सामना? पाहा एकाच क्लिकवर

कसोटीत १००० धावा

जो रुटने मुल्तान कसोटीत अनेक मोठे रेकॉर्ड्स मोडून काढले आहेत. त्याने या डावातील ७१ धावा करताच त्याने २०२४ मध्ये फलंदाजी करताना १००० धावांचा पल्ला गाठला आहे. त्याने २०२४ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना १००० धावा पूर्ण केल्या आहेत.

आतापर्यंत त्याने ५ वेळेस हा कारनामा करुन दाखवला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. सचिनने ६ वेळेस हा कारनामा करुन दाखवला आहे. तर रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस, ब्रायन लारा, एलिस्टर कुक आणि कुमार संगकारा यांनी देखील आपल्या कसोटी कारकिर्दीत ५ वेळेस हा कारनामा करुन दाखवला होता.

Joe Root: जो रुट बनला इंग्लंडचा 'ऑल टाईम ग्रेट' बॅट्समन! दिग्गज फलंदाजांना सोडलं मागे
IND vs BAN: मोठी बातमी! दुसऱ्या सामन्याआधी स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ५००० धावा

जो रुटच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. जो रुटने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या आहेत. असा कारनामा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. इतर कुठला फलंदाज त्याच्या आसपासही नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com