sunil gavaskar  twitter
Sports

Sunil Gavaskar, IND vs AUS: निव्वळ मुर्खपणा...रिषभ पंतच्या त्या कृत्यावर सुनील गावसकर भडकले

Sunil Gavaskar On Rishabh Pant: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटीत संघाला गरज असताना रिषभ पंत नको तो शॉट खेळून बाद झाला. तो बाद होताच सुनील गावसकरांनी त्याला झापलं आहे.

Ankush Dhavre

मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचा डाव फसला आहे. अशा परिस्थितीत फलंदाजीला आलेला रिषभ पंत, डाव सावरायचं सोडून अलटी पलटी फटके मारताना दिसून आला.

यादरम्यान तो २८ धावा करून माघारी परतला. रिषभ पंतला ज्यावेळी जबाबदारीने खेळायचं होतं, त्यावेळी तो विकेट फेकून माघारी परतला. ज्यावेळी रिषभ पंत बाद झाला त्यावेळी भारताला फॉलोऑन वाचवण्यासाठी ८५ धावा करायच्या होत्या. या चुकीमुळे त्याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे. यासह भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकरांनी देखील त्याच्यावर जोरदार टीका केली आहे.

ऑस्ट्रेलियाने केलेल्या ४७४ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात दमदार सुरुवात केली. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी पहिल्या दिवशी १६४ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविंद्र जडेजा आणि रिषभ पंतची जोडी मैदानात उतरली. दोघांनी मिळून संघाचा डाव पुढे नेला. तोपर्यंत ऑस्ट्रेलियन गोलंदाज अडचणीत असल्याचं दिसून येत होतं.

ज्यावेळी ऑस्ट्रेलियन गोलंदाज अडचणीत होते, त्यावेळी रिषभ पंतने रॅम्प शॉट मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न हुकला, मात्र पुढच्या चेंडूवर त्याने पुन्हा एकदा हा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेंडू हवेत गेला आणि नॅथन लायनने सोपा झेल घेतला.

ज्यावेळी रिषभ पंत फलंदाजी करत होता, त्यावेळी भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर समालोचन करत होते. समालोचन करत असताना ते म्हणाले, ' मूर्खपणाची हद्द असते, तिकडे २ क्षेत्ररक्षक तैनात आहेत. तरीसुद्धा त्याला तोच फटका का खेळायचा आहे? त्याने आधी जो फटका मारण्याचा प्रयत्न केला, तो फसला होता. आता तुम्हीच पाहा, कोणत्या क्षेत्ररक्षकाने हा झेल घेतलाय. रिषभ गिफ्ट म्हणून आपला विकेट देऊन आला आहे.'

तसेच ते पुढे म्हणाले, ' हा त्याचा स्वाभाविक खेळ नाहीये, पण हा निव्वळ मूर्खपणा आहे. त्याने परिस्थितीनुसार खेळ करायला हवा.' भारतीय संघ या डावात अडचणीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Krantijyoti Vidyalay Collection : 'क्रांतीज्योती विद्यालय...' बॉक्स ऑफिसवर सुसाट, अमेय वाघच्या चित्रपटानं आठवड्याभरात कमावले तब्बल 'इतके' कोटी

BP चा त्रास होईल कमी; आत्ताच 'या' ४ सवयी करा फॉलो, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Archana Puran Singh: अर्चना पूरण सिंगला झाला 'हा' गंभीर आजार; मुलाने भावूक होऊन केला खुलासा

Fashion Tips 2026: 'कपडे मोठे पण दिसाल स्टायलिश', हे आहेत 5 ट्रेडिंग ओव्हरसाईज्ड कपडे पॅटर्न

SCROLL FOR NEXT