team-india saam tv news
क्रीडा

IND vs AUS, Playing XI: ऑस्ट्रेलिया कमबॅक करणार की टीम इंडिया मालिका जिंकणार? पाहा संभाव्य प्लेइंग ११ अन् पिच रिपोर्ट

Ankush Dhavre

Ind vs Aus 3rd T20I Playing 11 And Match Prediction:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या टी -२० सामन्याचा थरार आज गुवाहाटीत रंगणार आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला असून मालिकेत २-० ची आघाडी घेतली आहे.

हा सामना जिंकून भारतीय संघ विजयाची हॅट्ट्रिक करण्यासह मालिका आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात असेल. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियासाठी हा सामना करो या मरो सामना असणार आहे. दरम्यान जाणून घ्या कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११.

पिच रिपोर्ट..

हा सामना गुवाहातीतील बारसापारा स्टेडियमवर रंगणार आहे. या मैदानावर आतापर्यंत ३ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या खेळपट्टीवर गोलंदाजांना गती आणि उसळी चांगली मिळते. त्यामुळे बॉल बॅटवर चांगल्याप्रकारे येतो.

हेच कारण आहे की, ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. २०२२ मध्ये झालेल्या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २३७ धावांचा डोंगर उभारला होता. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांनाही मदत मिळते.

मॅच प्रेडिक्शन..

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने या मालिकेत आतापर्यंत दमदार खेळ केला आहे. पहिल्या सामन्यात २०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग केला. तर दुसऱ्या सामन्यात २०० पेक्षा अधिक धावसंख्या उभारली. त्यामुळे भारतीय संघ तिसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची चिन्ह दिसून येत आहेत. (Latest sports updates)

अशी असू शकते भारताची प्लेइंग ११:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड़, इशान किशन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा.

अशी असू शकते ऑस्ट्रेलियाची प्लेइंग ११:

स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट/ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मार्कस स्टोइनिस, टिम डेविड, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (कर्णधार आणि यष्टिरक्षक), सीन अबॉट, नाथन एलिस, ॲडम झाम्पा, तनवीर संघा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladaki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना' कधीच बंद होणार नाही, PM मोदींसमोर मुख्यमंत्र्यांनी दिली गॅरंटी

Mangal Gochar: दिवाळीपूर्वीच काही राशींचं चमकणार नशीब; दिवाळीच्या १० दिवसांपूर्वी मंगळ देणार भरपूर पैसे- सुख

PM Modi Speech : समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, काँग्रेसपासून सावध राहा; वाशिमच्या सभेतून PM मोदींचा घणाघात

Coconut Water: रोज नारळ पाणी पिताय तर सावधान! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Marathi News Live Updates : काँग्रेस गरिबाला अजून गरीब करत आहे - PM मोदी

SCROLL FOR NEXT