India vs Australia T20 Marsh and Suryakumar Yadav / X saam tv
Sports

Ind Vs Aus T20 : गिल, सॅमसन, कर्णधार सूर्यकुमार, तिलक; ऑस्ट्रेलियाचे भारताला एकापाठोपाठ ४ धक्के

India vs Australia 2nd T20 Highlights : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला एकापाठोपाठ ४ धक्के बसले आहेत. शुभमन गिल, संजू सॅमसन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्यानंतर तिलक वर्माही बाद झाला.

Nandkumar Joshi

वनडे मालिका गमावल्यानंतर टी २० मालिका जिंकण्याचे स्वप्न घेऊन मैदानात उतरलेला भारतीय संघ अडखळताना दिसतोय. पहिला टी २० सामना रद्द झाल्यानंतर दुसऱ्या टी २० सामन्यातही भारताची अत्यंत खराब सुरूवात झाली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला लागोपाठ चार धक्के बसले आहेत. शुभमन गिल, संजू सॅमसन, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हे आघाडीचे चार फलंदाज बाद झाले आहेत. अवघ्या ३२ धावांवर ४ विकेट गमावल्या आहेत.

मेलबर्नच्या मैदानात आज, शुक्रवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा टी २० सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श यानं टॉस जिंकून भारताला फलंदाजीला निमंत्रित केलं. ऑस्ट्रेलियानं संघात एक बदल केला. तर भारतानं कुठलाही बदल केला नाही. भारताला तिसऱ्या षटकातच शुभमन गिलच्या रुपानं पहिला झटका दिला. चौथ्या ओव्हरमध्ये संजू सॅमसन अवघ्या २ धावांवर बाद झाला. तर सूर्यकुमार यादव एक धाव करून माघारी परतला. त्यानंतर आलेला तिलक वर्मा देखील खातं न उघडता तंबुत परतला.

मेलबर्न टी २० सामन्यात ६ षटकांच्या पॉवर प्लेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी तिखट मारा केला. ऑस्ट्रेलियानं भारताचे चार महत्वाचे फलंदाज माघारी धाडले. अभिषेक शर्मा एका बाजूने किल्ला लढवत आहे. तर शुभमन गिल, सॅमसन, कर्णधार सूर्यकुमार आणि तिलक वर्मा हे चौघेही बाद झाले आहेत. संजू सॅमसनला तिसऱ्या क्रमांकावर प्रमोट केलं होतं. पण प्रशिक्षक गौतम गंभीरने टाकलेला डाव संघावरच उलटला. तो फक्त २ धावा करून बाद झाला. नॅशन एलिस यानं त्याला पायचीत केलं.

शुभमन गिलला जोश हेजलवुड यानं अवघ्या ५ धावांवर झेलबाद केलं. मिचेल मार्श यानं गिलचा सोपा झेल पकडला. जबरदस्त फॉर्मात असलेल्या हेजलवुडनेच सूर्यकुमार यादवला बाद केलं. जोश इंग्लिस यानं त्याचा झेल पकडला. तर तिलक वर्मालाही त्यानं झेलबाद केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : महाराष्ट्र हादरला! ७ वर्षीय चिमुकलीवर शाळेत अत्याचार, नराधम शिक्षकाने केलं हैवानी कृत्य

Maharashtra Live News Update : मावळात दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित

Winter Care: हिवाळ्यात सकाळी सूर्यप्रकाश घेतल्याने कोणते फायदे मिळतात? एकदा जाणून घ्या

Pune MHADA Lottery: पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या ४१८६ घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी मुदत वाढवली; शेवटची तारीख काय?

Pune : पुण्यात भाऊच झाला वैरी! भावाची निर्घृण हत्या केली, अन् मृतदेह पोत्यात भरून फेकून दिला

SCROLL FOR NEXT