rinku singh  saam tv news
Sports

IND vs AUS, Last Over: W,W,W अन् रिंकूचा मॅचविनिंग षटकार; शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?

India vs Australia, 1st T2OI: भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ पहिला टी-२० सामना खेळण्यासाठी आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

India vs Australia, 1st T20I Highlights:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टनमच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने २ गडी राखून विजय मिळवला.

या सामन्यात भारतीय कर्णधार सुर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला.

इंग्लिसच्या शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ३ गडी बाद २०८ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना रिंकू सिंगने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०९ धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलागा करताना भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. अवघ्या २२ धावांवर सलामी जोडी बाद होऊन माघारी परतली होती. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनने मिळून संघाचा डाव सांभाळला.

दोघांनी मिळून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. हे दोघं जेव्हा फलंदाजी करत होते तेव्हा असं वाटत होतं की, भारतीय संघ या सामन्यात एकतर्फी विजय मिळवणार. (India vs Australia 1st T20I)

मात्र त्यानंतर इशान किशन आऊट होऊन माघारी परतला. इशान बाद होऊन माघारी परतल्यानंतर तिलक वर्माने जबाबदारी स्विकारली आणि संघाचा डाव पुढे नेला. भारतीय संघ विजयाच्या अगदी जवळ असताना सूर्यकुमार यादव बाद होऊन माघारी परतला. (Rinku Singh)

शेवटच्या षटकात काय घडलं?

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात ७ धावांची गरज होती. त्यावेळी रिंकू सिंग स्ट्राईकवर होता. रिंकूसारखा फलंदाज स्ट्राईकवर असताना भारतीय संघाचा विजय निश्चित आहे असं वाटलं होतं.

ऑस्ट्रेलियाकडून शेवटचं षटक टाकण्यासाठी शॉन अबॉट गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या रिंकू सिंगने चौकार मारला.या चौकारानंतर भारतीय संघाला ५ चेंडूत ३ धावांची गरज होती. ,

या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर रिंकू सिंगला बाय स्वरुपात एक धाव मिळाली. स्ट्राईक अक्षर पटेलकडे होती. इथुन पुढे भारतीय संघाला जिंकण्यासाठी २ धावांची गरज होती. तिसऱ्या चेंडूवर अक्षर पटेलने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बाद होऊन माघारी परतला. चौथ्या चेंडूवर रवी बिश्नोई बाद होऊन माघारी परतला. (Latest sports updates)

पाचव्या चेंडूवर रिंकू सिंगने डिप मिडविकेटच्या दिशेने शॉट मारला. दोघांनी एक धाव पूर्ण केली. मात्र दुसरी धाव घेत असताना अर्शदीप सिंग बाद होऊन माघारी परतला. शेवटच्या चेंडूवर भारतीय संघाला विजयासाठी १ धावेची गरज होती. त्यावेळी रिंकू सिंगने षटकार मारुन संघाला विजय मिळवून दिला. हा नो चेंडू होता, त्यामुळे भारतीय संघाने एक चेंडू शिल्लक असतानाच विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

Marathi bhasha Vijay Live Updates : कोणाची माय व्यायली त्यांनी मुंबईला हात लावून दाखवावा - राज ठाकरेंचा इशारा

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT