rohit sharma with virat kohli saam tv news
Sports

Rohit Sharma: 'तो सहसा असं करत नाही...' विराटबाबत बोलताना रोहितचं मोठं वक्तव्य

Rohit Sharma On Virat Kohli: टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहलीला हव तसं कमबॅक करता आलेलं नाही. दरम्यान रोहितने विराटबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma Statement On Virat Kohli:

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेनंतर विराट आपला पहिलीच टी-२० मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरला. मात्र त्याला टी-२० क्रिकेटमध्ये हवं तसं कमबॅक करता आलेलं नाही. बुधवारी भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये तिसरा टी-२० सामना पार पडला. या सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद होऊन माघारी परतला. त्याने पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. या नादात त्याला आपली विकेट गमवावी लागली.

विराट कोहलीच्या विकेटबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ३५ वर्षीय विराट सुरुवातीपासूनच संघर्ष करताना दिसून आला. तो सहसा असं करत नाही.' त्याने या मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यातही आक्रमक फलंदाजी केली. त्याने १६ चेंडूंचा सामना करत २९ धावांची खेळी केली. शेवटी नवीन उल हकच्या गोलंदाजीवर तो झेलबाद होऊन माघारी परतला.

जियो सिनेमावर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की,' आम्हाला आमच्या खेळाडूंना संघातील त्यांच्या स्थानाबद्दल आणि त्यांच्याकडून संघाला अपेक्षित आहे हे सांगणं गरजेचं आहे. मैदानावर गेल्यानंतर काय करायचं आहे हे त्यांना चांगल्याने माहित आहे.' (Latest sports updates)

रोहित आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो, अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान जेव्हा त्याला टी-२० वर्ल्डकपबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला की,'मी सध्या तरी टी-२० वर्ल्डकपचा विचार करत नाहीये. वर्ल्डकप जिंकणं हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. याचा अर्थ मी टी-२० वर्ल्डकपचा आदर करत नाही, असा होत नाही. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि आयसीसी टी-२० वर्ल्डकप या महत्वाच्या स्पर्धा आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neena Gupta Birthday: लग्न न करता झाली आई, मुलीसाठी केला संघर्ष; नीना गुप्ताने अशा प्रकारे मिळवले इंडस्ट्रीत हक्काचे स्थान

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

SCROLL FOR NEXT