ISHAN KISHAN Twitter
Sports

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज सलामीला येणार! इशान किशनलाही संधी; पाहा प्लेइंग ११

India A vs Australia A, Playing XI: भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणूनघ्या.

Ankush Dhavre

India A vs Australia A: बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेपूर्वी भारतीय अ संघ आणि ऑस्ट्रेलिया अ संघ या दोन्ही संघांमध्ये २ सराव सामने रंगणार आहेत. या मालिकेसाठी भारतीय अ संघातील खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत.

या मालिकेतील पहिला सामना ३१ ऑक्टोबरला रंगणार आहे. या मालिकेसाठी इशान किशन, ऋतुराज गायकवाड यांनी संधी देण्यात आली आहे. इशान किशन गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे.

त्यामुळे या मालिकेत चांगली कामगिरी करुन त्याच्याकडे भारतीय संघात कमबॅक करण्याची संधी असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११?जाणून घ्या.

सलामीला कोण येणार?

या सामन्यातील सलामी जोडीबद्दल बोलायचं झालं , कर्णधार ऋतुराज गायकवाडसोबत अभिमन्यू ईश्वरन डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो. ईश्वरनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे.

याच कामगिरीच्या बळावर त्याला भारतीय अ संघात स्थान दिलं गेलं आहे. दरम्यान या मालिकेत चांगली कामगिरी करुन तो भारताच्या मुख्य संघात स्थान मिळवण्यासाठी दावा करु शकतो. यासह साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.

इशान किशन करणार कमबॅक

ही मालिका इशान किशनसाठी अतिशय महत्वाची असणार आहे. कारण तो गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. संघाबाहेर झाल्यानंतर त्याची सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टमधूनही सुट्टी करण्यात आली होती. त्यावेळी त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला गेला होता. मात्र त्याने बीसीसीआयच्या आदेशाचं पालन केलं नव्हतं

आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतल्यानंतर त्याने दमदार खेळ करुन दाखवला. दुलीप ट्रॉफी स्पर्धेतही त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. याच कामगिरीची दखल घेत त्याला भारतीय अ संघात स्थान देण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलियावरुद्धच्या पहिल्या सामन्यात अशी असू शकते भारतीय अ संघाची प्लेइंग ११

ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), अभिमन्यु ईश्वरन, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिक्कल, इशान किशन (यष्टीरक्षक), यश दयाल, नवदीप सैनी, मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT