shubman gill google
Sports

Shubman Gill: 'पुढच्या मॅचमध्ये रन्स केल्या नाहीत तर..',दिग्गज खेळाडूची शुभमन गिलला वॉर्निंग

Dinesh Karthik On Shubman Gill: शुभमन गिलने वनडे आणि टी -२० क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये तो स्वत:ला सिद्ध करु शकलेला नाही.

Ankush Dhavre

Dinesh Karthik Statement On Shubman Gill:

भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल हा २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने वनडे आणि टी -२० क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये तो स्वत:ला सिद्ध करु शकलेला नाही. (Shubman Gill)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शुभमन गिलला अवघ्या २८ धावा करता आल्या. या फ्लॉप कामगिरीनंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने गिलच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले आहे. यासह त्याने सरफराज खानचं कौतुक केलं आहे. (Dinesh Karthik)

यापुढे जर चांगली कामगिरी नाही केली तर गिलला संघाबाहेर व्हावं लागेल अशी चेतावणी देत दिनेश कार्तिक म्हणाला की,'शुभमन गिलवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गिल अपेक्षेप्रमाणे कामगिरी करु शकलेला नाही. मला माहितेय की त्याला चांगलच माहित असेल की त्याने २० कसोटींमध्ये ३० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तो स्वत:ला भाग्यवान समजत असेल. तर त्याने पुढच्या सामन्यात चांगली कामगिरी केली नाही, तर त्याला आपली जागा गमवावी लागू शकते.' (Latest sports updates)

गेल्या काही वर्षांपासून सरफराज खानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार खेळ केला आहे. मात्र त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकलेलं नाही. त्याने खेळलेल्या ४२ कसोटी सामन्यांमध्ये ७०.९८ च्या सरासरीने ३६९१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १० अर्धशतकं तर १३ शतकं झळकावली आहेत. दिनेश कार्तिकचं स्पष्ट मत आहे की,सरफराज खान आणि रजत पाटीदारसारख्या खेळाडूंना प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळायला हवं.

सरफराज खानबद्दल बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला की, 'भारतीय संघाच्या मध्यक्रमात कुठेतरी सरफराज खानची कमतरता जाणवतेय. मला यात काहीच शंका नाही की, तो जितका विचार करतोय त्याहुन कमी वेळात तो भारतीय संघात स्थान मिळवेल. तसेच रजत पाटीदार देखील प्रबळ दावेदार आहे. मला असं वाटतंय की, ते लवकरच या खेळाडूंना संघात स्थान देण्याचा विचार करतील.'

शुभमन गिलच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत १९ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ३१ च्या सरासरीने ९९४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतक झळकावले आहेत. तर वनडेमध्ये त्याची सरासरी ४४ ची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT