Dinesh karthik Latest News : टीम इंडियातील 'बेस्ट फिनिशर' अशी ओळख असलेला डीके अर्थात दिनेश कार्तिक याच्यासाठी टी २० वर्ल्डकप २०२२ खूपच निराशाजनक ठरला. फिनिशर म्हणून जी अपेक्षा त्याच्याकडून क्रिकेट चाहत्यांना होती, त्या अपेक्षा तो पूर्ण करू शकलेला नाही. दुसरीकडे ही स्पर्धा त्याची अखेरची असू शकेल, असंही बोलले जात होते. आता याच संदर्भात मोठी अपडेट आली आहे.
कार्तिकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यानं निवृत्तीचे संकेत दिले आहेत. निवृत्त होणार नाही, असं त्यानं स्पष्ट केले असले तरी, क्रिकेट चाहत्यांना तो निवृत्ती घेणार असल्याचं वाटतंय. (Sports News)
दिनेश कार्तिकला टी २० वर्ल्डकपमध्ये सुरुवातीच्या लढतींमध्ये टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी दिली होती. मात्र, त्याच्या बॅटमधून धावा काही निघू शकल्या नाहीत. त्यानंतर इंग्लंडच्या विरुद्ध महत्वाच्या सेमिफायनल सामन्यात त्याच्या जागी रिषभ पंतला खेळवण्यात आलं.
कार्तिक आता ३७ वर्षांचा आहे. त्यामुळे पुढचा वर्ल्डकप खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. कार्तिकनेही निवृत्तीचे संकेत दिले आहेत. (Cricket News)
कार्तिकने शेअर केला स्पेशल व्हिडिओ
कार्तिकने सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात संघ सहकारी, कुटुंबीय आणि मैदानावर खेळतानाचे फोटो आहेत.
याशिवाय 'ड्रीम डू कम ट्रू (स्वप्न खरे असतात.)', टी २० वर्ल्डकप. वर्ल्डकपसाठी भारतीय संघात असणं अभिमानाची बाब आहे. आम्ही भले स्पर्धा जिंकू शकलो नाही, पण या आठवणी मला कायमच आनंदी ठेवतील. मी माझ्या सर्व सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, मित्र आणि चाहत्यांचे आभार मानू इच्छितो. त्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला, असं कार्तिकनं पोस्टमध्ये नमूद केलंय.
व्हिडिओ पाहा!
जवळपास दोन दशकांची कारकीर्द
दिनेश कार्तिकने २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. २००७ मध्ये झालेल्या टी २० वर्ल्डकपमध्येही तो होता. महेंद्रसिंग धोनी असल्याने त्याला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारशी संधी मिळू शकली नव्हती. गेल्या काही वर्षात तो भारतीय संघात पुनरागमन करण्यास यशस्वी ठरला.
२०१९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियात कार्तिक होता. त्यानंतर गेल्या वर्षीही त्याला टी २० वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी मिळाली. कार्तिकला आता कुटुंबीयांना वेळ द्यायचा असल्याने तो अधिकृत निवृत्तीची घोषणा लवकरच करू शकतो, असे बोलले जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.