आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ आता निर्णायक टप्प्यात पोहचला आहे. स्टेज लीगचे उर्वरित सामने पूर्ण झाल्यानंतर सेमीफायनलच्या सामन्यांचा थरार रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि भारत हे संघ वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेत. टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवून सेमीफायनमध्ये आपली जागा पक्की केली. तर ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करुन पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान कायम ठेवले.
पहिला सेमीफायनल सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाईल, तर दुसऱ्या सामन्यात भारत ऑस्ट्रेलियाशी भिडेल. दोन्ही सेमीफायनल फेरीतील विजेते संघ २ नोव्हेंबर रोजी महिला वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळतील.
सेमीफायनलचा थरार रंगणार
स्टेज लीगच्या सामन्यानंतर, भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड या संघानी सेमीफायनलमध्ये एन्ट्री केली. तर श्रीलंका, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेश या संघाचा वर्ल्डकप स्पर्धेतील प्रवास संपला आहे. आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५चा पहिला सेमीफायनल सामना २९ ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथील बरसपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी ३ वाजता सुरु होईल. महिला वर्ल्डकपच्या पॉईंट्सटेबलमध्ये दक्षिण अफ्रिका दुसऱ्या तर इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे.
सेमीफायनलमध्ये पुन्हा भिडणार भारत- ऑस्ट्रेलिया
भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एका चुरशीच्या सामन्यात भिडणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनचा दुसरा सामना ३० ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार ३ वाजता सामन्याला सुरुवात होईल. स्टेज लीग सामन्यात टीम इंडियाने सहापैकी तीन सामने जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत. भारताचा नेट रन रेट +०.६२८ आहे, ज्यामुळे संघ पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे.
आयसीसी महिला वर्ल्डकप पॉईंट्स टेबल
आयसीसीच्या नियमांनुसार, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या संघाचा सामना चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाशी होईल. ऑस्ट्रेलिया १३ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिका १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंड ९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि भारत ६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. भारत आणि इंग्लंडचा एक सामना शिल्लक आहे, परंतु त्यांच्या निकालांमुळे पॉईंट्स टेबलमध्ये बदल होणार नाही. टीम इंडियाने बांग्लादेशविरुद्ध सामना जिंकला तरी ते आठ गुणांसह चौथ्या क्रमांकावरच राहणार.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.