rahul dravid google
Sports

T20 world Cup 2024 : फायनलपूर्वी राहुल द्रविड यांचं मोठं वक्तव्य, भारत-दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याचा प्लानच सांगितला

rahul dravid on T20 world Cup 2024 : टी२० विश्वचषक स्पर्धेच्या फायनलपूर्वी राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राहुल द्रविड यांनी भारत-दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याचा प्लानच सांगितला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : टी२० विश्वचषक स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ एकमेकांशी भिडणार आहे. या अंतिम सामन्याविषयी सर्वांना उत्सुकता लागली आहे. या अंतिम सामन्याआधी संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

फायनल टीमसाठी भारतीय संघाची तयारी कशी सुरु आहे, यावर राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राहुल द्रविड यांनी यावेळी विराट कोहलीच्या फॉर्मवरही मोठं भाष्य केलं. राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणात भारतीय संघाचा शेवटचा सामना असणार आहे. या सामन्यानंतर राहुल द्रविड हे टीम इंडियाचं प्रशिक्षक पद सोडणार आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याआधी राहुल द्रविड यांनी म्हटलं की, 'निवांत राहा. जास्त पुढचा विचार करण्याची गरज नाही. जास्त मागचाही विचार करण्याची गरज नाही. फक्त प्लाननुसार चालण्याचा विचार केला पाहिजे. फक्त तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळण्याची गरज आहे'.

द्रविड यांनी पुढे म्हटलं की, 'दक्षिण आफ्रिकेचा संघही मजबूत आहे. त्याच्या संघाकडे चांगले खेळाडू आहेत. टीम संघाने फक्त आनंदात राहिलं पाहिजे'.

राहुल द्रविड विराट कोहलीवर काय बोलले?

विराट कोहलीवर भाष्य करताना द्रविड यांनी म्हटलं की, 'तुम्ही जरा आक्रमक खेळ सुरु करताना काही बाबतीत यशस्वी होत नाही'. हसत हसत द्रविड पुढे म्हणाले की, विराट कोहली चांगली कामगिरी करत आहे. भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या सामन्यात विराट चांगला खेळ दाखवू शकतो'.

दरम्यान, टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिका आणि इंडियामध्ये भिडत होणार आहे. हा अंतिम सामना शनिवारी रात्री होणार आहे. दक्षिण अफ्रिकेचा संघ पहिल्यांदा टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. शनिवारी रात्री होणाऱ्या या सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमी लक्ष असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय, पती अन् मित्राकडून आळीपाळीनं बलात्कार; नंतर हात पाय बांधून नदीत फेकून दिलं

Aneet Padda : 'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला लागला जॅकपॉट, मिळाली मोठ्या प्रोजेक्टची ऑफर

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

SCROLL FOR NEXT