IND vs SA, Records: दक्षिण आफ्रिकेचा 'लकी बॉय', मार्करमचा हा रेकॉर्ड पाहून टीम इंडियाचं टेन्शन वाढणार

Aiden Markram Captaincy Record, IND vs SA Final: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना रंगणार आहे.
IND vs SA, Records: दक्षिण आफ्रिकेचा 'लकी बॉय', मार्करमचा हा रेकॉर्ड पाहून टीम इंडियाचं टेन्शन वाढणार
aiden markramtwitter
Published On

बारबाडोसमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना रंगणार आहे. फायनलमध्ये जाणारे २ संघ ठरले आहेत. भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला एकतर्फी लोळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही संघ २९ जून रोजी आयसीसीची ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.

हा रेकॉर्ड वाढवतोय भारतीय संघाचं टेन्शन

फायनलमध्ये भारतीय संघाचा सामना बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. मुख्य बाब म्हणजे भारतीय संघ या स्पर्धेत अजेय आहेत. भारतीय संघाचा साखळी फेरीतील १ सामना पावसामुळे रद्द झाला होता, उर्वरीत सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीतील आणि सुपर ८ फेरीतील सर्व सामने जिंकले आहेत. इथपर्यंत दोन्ही संघांची लढत बरोबरीत आहे. मात्र एडेन मार्करमच्या रेकॉर्डने भारतीय संघाचं टेन्शन वाढवलं आहे.

IND vs SA, Records: दक्षिण आफ्रिकेचा 'लकी बॉय', मार्करमचा हा रेकॉर्ड पाहून टीम इंडियाचं टेन्शन वाढणार
IND vs ENG, Semi Final: गुजरातचा 'बापू' इंग्लंडवर पडला भारी! इंग्लंडला लोळवत टीम इंडियाची तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

या स्पर्धेसाठी एडेन मार्करमकडे दक्षिण आफ्रिकेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचा आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला, तर त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना दक्षिण आफ्रिकेने आजवर एकही सामना गमावलेला नाही. २०१४ अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत तो दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार होता.

IND vs SA, Records: दक्षिण आफ्रिकेचा 'लकी बॉय', मार्करमचा हा रेकॉर्ड पाहून टीम इंडियाचं टेन्शन वाढणार
IND vs ENG: टीम इंडियाने करुन दाखवलं! फायनलमध्ये पोहोचताच रोहितला अश्रू अनावर, पाहा भावुक करणारा VIDEO

त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने ६ सामने जिंकले होते. त्यानंतर २०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत त्याला २ सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील ८ पैकी ८ सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आहे. आता दक्षिण आफ्रिकेचा संघ ९ वा विजय मिळवून ट्रॉफी उंचावण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com