IND vs ENG, Semi Final: गुजरातचा 'बापू' इंग्लंडवर पडला भारी! इंग्लंडला लोळवत टीम इंडियाची तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

India vs England,T20 World Cup 2024: भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये इंग्लंडचा एकतर्फी पराभव करत तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
IND vs ENG, Semi Final: गुजरातचा 'बापू' इंग्लंडवर पडला भारी! इंग्लंडला लोळवत टीम इंडियाची तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक
team indiatwitter

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सेमिफायनलचा सामना पार पडला. गयानाच्या मैदानावर पावसाने जोरदार बॅटिंग केली. सामन्यापूर्वीच पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. हा अंदाज खरा ठरला. पावसामुळे सामना उशिराने सुरू झाला आणि मधल्या षटकांमध्येही पावसाने सामन्याला रेड सिग्नल दिला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने इंग्लंडसमोर १७२ धावांचं आव्हान ठेवलं. या धावांचा बचाव करताना भारतीय संघाने ६८ धावांनी विजय मिळवला आहे. यासह तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं निमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जोडी मैदानावर आली. या सामन्यात विराट कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र या सामन्यातही तो स्वस्तात माघारी परतला. तो ९ चेंडूत ९ धावा करत माघारी परतला. त्यानंतर रिषभ पंतही अवघ्या ४ धावा करत माघारी परतला. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला.

IND vs ENG, Semi Final: गुजरातचा 'बापू' इंग्लंडवर पडला भारी! इंग्लंडला लोळवत टीम इंडियाची तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक
IND vs ENG : इंग्लंड विरुद्ध इंडियाच्या सामन्याआधी वरुणराजाची बॅटिंग, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणाला फायदा होणार?

रोहित - सूर्याने सांभाळला डाव

विराट आणि रिषभ स्वस्तात माघारी परतल्यानंतर, रोहित आणि सूर्यकुमार यादववर मोठी जबाबदारी होती. दोघांनी मिळून संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं. रोहितने चौकार - षटकार मारत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र त्यानंतर तो ५७ धावा करत माघारी परतला. सूर्यकुमार यादवला अर्धशतक झळकवण्याची संधी होती. त्याने ३६ चेंडूंचा सामना करत ४७ धावांची खेळी केली. शेवटी हार्दिक पंड्याने ख्रिस जॉर्डनच्या षटकात लागोपाठ २ षटकार मारले. तिसऱ्या चेंडूवरही त्याने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो २३ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. शेवटी रविंद्र जडेजाने १७ आणि अक्षर पटेलने १० धावांची खेळी करत संघाची धावसंख्या १७१ धावांवर पोहोचवली.

IND vs ENG, Semi Final: गुजरातचा 'बापू' इंग्लंडवर पडला भारी! इंग्लंडला लोळवत टीम इंडियाची तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक
IND vs ENG Semi Final : रोहित- सूर्याची दमदार सुरुवात; इंग्लिश गोलंदाजांचा भेदक मारा! टीम इंडियाचं इंग्लंडसमोर १७२ धावांचं आव्हान

फिरकीच्या जाळ्यात अडकले इंग्लंडचे फलंदाज

इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी १७२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना जोस बटलर आणि फिल सॉल्टने आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र अक्षर पटेलने संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर बुमराहने सॉल्टला बाद करत माघारी धाडलं. भारतीय संघातील फिरकी गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करताना इंग्लंडचे फलंदाज गोत्यात आल्याचे पाहायला मिळालं. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना अक्षर पटेलने ३,कुलदीप यादवने ३ आणि जसप्रीत बुमराहने २ गडी बाद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com