ICC T20 Rankings google
Sports

Abhishek Sharma: इंग्लंडच्या गोलंदाजांना फोडून काढणाऱ्या अभिषेक शर्माचा ICC टी20 रँकिंगमध्ये जलवा

ICC T20 Rankings: अभिषेक शर्माने आयसीसीकडून जाहीर करण्यात आलेल्या टी २० रँकिंगमध्ये मोठी झेप घेतलीय. जगभरातील फलंदाजांना शर्माने मागे सोडलंय.

Bharat Jadhav

आयसीसी टी२० रँकिंगमध्ये परत एकदा शर्मा नावाचा डंका पाहायला मिळत आहे.इंग्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अभिषेक शर्माच्या दमदार फटकेबाजीमुळे जगभरातील फलंदाजांना घाम फोडला. त्याच असं की, आयसीसीकडून टी२० कडून जाहीर करण्यात आलेल्या रँकिंगच्या यादीत अभिषेक शर्माने मोठी झेप घेतलीय. या रँकिंगमध्ये अभिषेक शर्मा पहिल्यास्थानी पोहोचले नसला तरी स्थानापासून एक पाऊल दूर आहे. त्यामुळे पहिल्या क्रमावर असलेल्या ट्रेव्हिस हेडची डोकेदुखी वाढलीय.

अभिषेक शर्माने ३८ स्थानावर घेतली झेप

ICC ने यावेळी जाहीर केलेल्या नवीन टी२० क्रमवारीत अभिषेक शर्माने मोठी झेप घेतलीय. यादी जाहीर होण्याआधी अभिषेक शर्मा हा ३० स्थानांची झेप घेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. अभिषेक शर्माचे हे सर्वकालीन उच्च रँकिंग आहे. त्याने प्रथमच टॉप १०मध्ये प्रवेश केलाय याशिवाय तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. दरम्यान पहिला क्रमांकावर अजून ट्रॅव्हिस हेड आहे. हेडची रेटिंग सध्या ८५५ आहे.

तर अभिषेक शर्मा तो ८२९ रेटिंगसह नंबर दोनवर आलाय. अभिषेकने आयसीसीच्या रँकिंगमध्ये सरशी केल्यामुळे सर्व फलंदाजांना त्यांच्या स्थानावरून एका जागेवरून खाली यावे लागले आहे. सध्या भारताचा टिळक वर्मा एका स्थानाच्या घसरणीसह ICC T20 क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. त्याची रेटिंग ८०३ आहे. इंग्लंड संघाचा फिल साल्टही खालच्या घरात म्हणजेच एक अंकाने खाली आलाय. त्याची रेटिंग ७९८सह चौथ्या नंबर आहे.

भारताचा सूर्यकुमार यादवचं स्थानही खाली आले आहे. त्याची रेटिंग ७३८ असून तो ५ नंबरवर आहे. या यादीतील टॉप ५ फलंदाजांची माहिती घेतली तर, इंग्लंडच्या जोस बटलरलाही एक स्थान गमवावे लागले आहे. तो सध्या ७२९ रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आलाय. पाकिस्तानचा बाबर आझम एका स्थानाने घसरून सातव्या क्रमांकावर आलाय.

त्याची रेटिंग ७१२ आहे. श्रीलंकेचा पथुम निसांका ७०७ रेटिंगसह आठव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान ७०४ रेटिंगसह ९व्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेच्या कुसल परेराला मात्र आपले दहावे स्थान वाचवण्यात यश आले आहे. त्याचे रेटिंग सध्या ६७५ वर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT